सोमाटणे, ता. २ : कृषीकन्या व गहुंजे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करुन शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषीदिन साजरा करण्यात आला. डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आकुर्डी येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थीनी रिद्धी बोत्रे, माया धडस, आयुषी देसाई, मृदुला लांडगे, स्वानंदिनी लोखंडे, सानिका वशिवले यांच्या वतीने कृषी कन्या उपक्रमाअंतर्गतच गहुंजे येथे प्रात्याक्षिकांसह शेतकरी प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत गेल्या चार दिवसांत वृक्षारोपणाचे महत्त्व, अधिक उत्पादन व रोगमुक्त पीक उत्पादन घेण्याचे तंत्र, आधुनिक शेती पद्धतीचे फायदे, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन काढण्याचे तंत्र, नैसर्गिक कीटनाशके व खताचा वापर, पाणी व्यवस्थापन, माती परीक्षणाचे महत्त्व आदी विषयांचे प्रात्याक्षिकांसह मार्गदर्शन कृषीकन्यांच्या वतीने करण्यात आले. कृषी दिनाचे औचित्य साधून या कृषी कन्यांच्या वतीने सरपंच कुलदीप बोडके, सदस्य हिरामन आगळे, उद्योजक निखील बोडके, विश्वास येवले यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शेतकरी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले.
गहुंजे : वृक्षारोपण करून कृषीदिन साजरा करताना कृषी कन्या, विद्यार्थिनी, शेतकरी यांच्यासह सरपंच कुलदीप बोडके.
PNE25V27946
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.