पिंपरी, ता. ३ ः इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी-चिंचवड, भोसरी शाखेच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून ‘डॉक्टर नागरिक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य चर्चासत्र, तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पार पडणाऱ्या या उपक्रमाचे उद्घाटन येत्या शनिवारी (ता. ५) ज्येष्ठ शास्त्रज्ञ अशोक नगरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ‘आएमए’चे शहराध्यक्ष डॉ. ललितकुमार धोका यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमासाठी प्रवेश मोफत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शनिवारी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत बाल आरोग्य व महिला आरोग्य चर्चासत्र होईल. तसेच प्रथमोपचार व सीपीआरचे प्रशिक्षण दिले जाईल. रविवारी (ता. ६) डोळे, कान-नाक-घसा, सांधेदुखी व हाडांचे आरोग्य, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व थायरॉइड या विविध विषयांवर चर्चासत्र होईल. तर कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांमधील मोबाईलचा वापर व व्यसनमुक्ती व गर्भाशयमुखाचा कर्करोग व लसीकरणातून प्रतिबंध या विषयांवर लघुनाटिका सादर केली जाईल. शालेय विद्यार्थ्यांसाठी भित्तीचित्र स्पर्धा पार पडेल. उपक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीची मोफत आरोग्याची तपासणी केली जाणार असून, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधक लसही देण्यात येणार आहे, त्यासाठी नोंदणी आवश्यक असेल, असेही यावेळी धोका यांनी सांगितले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.