पिंपरी-चिंचवड

दापोडीत तरुणावर प्राणघातक हल्ला

CD

पिंपरी, ता. ३ : तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून चार जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करीत परिसरात दहशत माजवली. ही घटना दापोडी येथे घडली.
या प्रकरणी मोईउद्दीन ऊर्फ मुन्ना रफिक शेख (रा. एसएमएस कॉलनी, लकी बेकरीजवळ, दापोडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साकिब रफिक शेख (वय ३२, रा. लोहगाव, मुळ रा. कासारवाडी), रवी मसलिंगाप्पा लकाबशेट्टी (वय २४, रा. शांतिनगर, विश्रांतवाडी), मोहसीन हनीप शेख (वय २०, रा. येरवडा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या मित्रांसह बोपोडी पुलाजवळील इनामदार पोल्ट्री फॉर्मसमोरील एका रिक्षात बसले होते. दरम्यान, तेथे आलेल्या आरोपींनी भांडणाच्या कारणावरून फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीला वाचविण्यासाठी आलेल्या लोकांच्या दिशेने कोयता फिरवून ‘मी दापोडीचा डॉन आहे’ अशी धमकी दिली. कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादीच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादीने तो चुकवला. फिर्यादी यांनी आरोपींच्या हातून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर आरोपींनी वाहनांच्या काचा फोडून मोटारीतून पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT