पिंपरी-चिंचवड

संवाद नागरीकांचा

CD

पीएमपी बसथांबा खासगी वाहनांच्या विळख्यात
नवी सांगवी कृष्णा चौक येथील सांगवी हॉस्पिटलसमोरच्या बस थांब्यावर खासगी वाहने रिक्षा सतत उभ्या असतात. त्यामुळे बस रस्त्यावरच उभ्या राहतात. तेथे प्रवाशांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढत धावतपळत बस मिळवावी लागते. काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ ने याविषयी आवाज उठवला होता. पण, सांगवी वाहतूक पोलिसांनी जुजबी कारवाई केली. हेच वाहतूक पोलिस मात्र दुचाकी ‘नो पार्किंग’मधून उचलायला अतिशय तत्परता दाखवतात.
- एस. के. काळे, नवी सांगवी
PNE25V28484

आधीच मेट्रोचे काम, त्यात खड्डे
सध्या पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जे बॅरिकेड्स लावले आहेत, त्याबाजूचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू आहे. मात्र, तेथे मोठे खड्डे पडले आहेत. वाहने चालवणे अडचणीचे आणि धोकादायक झाले आहे. दररोजच छोटे-मोठे अपघात निगडी ते चिंचवड या रस्त्यावर होत आहेत. तेथे नुकतेच एक महिला मोठ्या अपघातातून वाचली आहे. हे सर्व खड्डे भरून घेणे आवश्यक आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर यंत्रणा जागी होणार का ? रात्रीच्या वेळेस हे खड्डे दिसत नाहीत.
- अविनाश पाटील, चिंचवड.
NE25V28482

साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंध
साठ फुटी रस्ता पिंपळे गुरव येथे कचरा टाकू नये, हा फलक महापालिका प्रशासनाने लावला आहे. तरीही, नागरिक येथे कचरा टाकत आहेत. तो कचरा वेळेवर उचलला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे
- रोहन देसाई, पिंपळे गुरव
NE25V28481

सहा महिन्यांपासून कार पडून
किसनराव नांदगुडे कॉलनी छत्रपती बँक बिल्डिंगसमोर विशालनगर मुख्य रस्त्यावर कोणीतरी सदर कार सोडून गेले आहे. मागील सहा महिन्यांपासून ही कार अशीच थांबून आहे. परिसर आणि समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने याची दखल घ्यावी.
- गोविंद गायकवाड, वाकड
PNE25V28490

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT