पिंपरी-चिंचवड

गुन्हे वृत्त

CD

चोरीच्या संशयावरून
तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी : सोनसाखळी चोरल्याचा संशयावरून दोघांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. ही घटना निघोजे येथे घडली. याप्रकरणी काशिनाथ रंगनाथ भक्त (रा. निघोजे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दर्शन लक्ष्मण शिंदे, चैतन्य ज्ञानेश्वर येळवंडे (दोघेही रा. निघोजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गणेश बेंडाले याने आरोपी दर्शन याला सोनसाखळी दिली होती. ती सोनसाखळी फिर्यादी यांनी चोरल्याचा आरोपींना संशय होता. त्या कारणावरून आरोपी दर्शन याने काशिनाथ यांना बांबूने मारहाण केली. तसेच फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केली.
--------------------------------
टोळक्याकडून बेदम मारहाण
पिंपरी : रस्त्यात थांबवलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने चार जणांच्या टोळक्याने ‘आम्ही इथले भाई आहोत. इथे कोणतेच पोलिस येत नाहीत’ अशी धमकी देत एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना रहाटणीतील रामनगर येथे घडली.
याप्रकरणी भारत सुभाषचंद्र पंजाबी (रा. बंकर वस्ती, धायरी, पुणे) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित संजय लोणारे (वय २७, रा. रामनगर, रहाटणी) याला अटक केली आहे. तर त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी भारत हे रहाटणी येथून दुचाकीवरून जात होते. भालेराव कॉलनीतून जात असताना आरोपीने त्याची रिक्षा रस्त्यात थांबवली होती. दुचाकी जाण्यासाठी देखील जागा नसल्याने भारत यांनी आरोपीला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. आजूबाजूच्या लोकांनी देखील रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून आरोपीने भारत यांना शिवीगाळ केली. त्याच्या तीन साथीदारांना बोलावून भारत यांना मारहाण केली.
-------------------------

विरुद्ध दिशेने आलेल्या बसची दुचाकीला धडक

पिंपरी : विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव बसने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना तळेगाव-चाकण रस्त्यावर इंदोरी येथे घडली. याप्रकरणी अमोल मदन विश्वास (रा. इंदोरी, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अमोल विश्वास आणि त्यांचा मित्र दुचाकीवरून तळेगाव-चाकण रस्त्याने जात होते. इंदोरी येथे प्रशांत पेट्रोल पंपासमोर आरोपी बस चालक त्याच्या ताब्यातील बस विरुद्ध दिशेने भरधाव चालवत आला. त्या बसने अमोल यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात अमोल आणि त्यांचा मित्र दोघेही जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले.
--------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Accident: सूर्योदय पाहून परतताना क्षणात सर्व संपलं… मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघातात IIT च्या तीन विद्यार्थ्यांचा अंत

US Visa Bond Policy : डोनाल्ड ट्रम्प यांचा ५० देशांना दणका ! व्हिसा बाँड केला अनिवार्य, नेमकं काय आहे प्रकरण ?

Dharashiv:धाराशिवमध्ये गुढीपाडव्याला म्हशी-रेड्यांच्या शर्यतीचा थरार; परंपरेचा जल्लोष

Chhatrapati Sambhajinagar: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरखरेदीचा उत्साह; २५० गृहप्रवेशासह बाजारात तेजी

विद्यापीठाचा मोठा निर्णय! 'सीसीटीव्ही' असलेल्या कॉलेजमध्येच आता परीक्षा केंद्र; ‘लॉ’ची परीक्षा त्याच महाविद्यालयात, २ एप्रिलपासून परीक्षा, वाचा...

SCROLL FOR NEXT