पिंपरी-चिंचवड

होळकरवाडी टीपी स्‍कीमचा मार्ग मोकळा राज्‍य शासनाच्‍या नगररचना विभागाकडून मंजुरी

CD

पिंपरी, ता. ४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दाखल केलेल्‍या टाऊन प्‍लॅनिंग (टीपी) प्रस्तावातील होळकरवाडी क्रमांक चारच्‍या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्‍य शासनाच्‍या नगररचना विभागाकडून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाच्‍या सहसचिव सुलेखा वैजापूरकर, अ‍वर सचिव प्रणव कर्पे यांनी त्‍या बाबत अधिसूचना जारी केली आहे. या योजनेची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांसाठी एक महिना पीएमआरडीए कार्यालयात त्‍याची माहिती दिली जाणार आहे.
‘सकाळ’ने या बाबत सातत्‍याने वृत्त प्रसिद्ध केले आहे. ‘टीपीचा प्रस्‍ताव दीड वर्षांपासून धूळखात’ या मथळ्याखाली ३ जुलै रोजी वृत्‍त प्रसिद्ध केले. त्‍याची दखल घेत प्रशासनाने पाठपुरावा केला. होळकरवाडीच्‍या टीपी स्‍कीमला राज्‍य सरकारने हिरवा कंदील दाखविला.
मुळशी तालुक्‍यातील माण म्हाळुंगे, हवेली तालुक्‍यातील वडाचीवाडी, हांडेवाडी, मांजरी येथे प्रत्‍येकी एक. तर होळकरवाडी येथे दोन टीपी योजना राबविण्यात येणार आहेत. पीएमआरडीएने प्रारूप योजना आराखड्याला ३१ डिसेंबर २०२२ रोजी मंजुरी दिली आहे. त्‍यानंतर प्राथमिक योजना लवादाने राज्‍य शासनाकडे २१ डिसेंबर २०२३ रोजी पाठविला आहे. प्रस्‍तावित या योजनांपैकी होळकरवाडी क्रमांक चार काही बदलांसह मंजूर करण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. जुलैत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेचे स्‍वरूप त्‍याची माहिती नागरिकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे. पीएमआरडीए कार्यालयात नागरिकांच्‍या निरीक्षणाकरिता ही माहिती उपलब्ध केली जाणार आहे.

उर्वरित पाच योजनेची प्रतिक्षा -
होळकरवाडी येथील क्रमांक चारच्‍या टीपी स्‍कीमच्‍या मंजुरीला दीड वर्षांनी मुहूर्त मिळाला आहे. आता उर्वरित पाच ठिकाणच्‍या टीपी स्‍कीमला मंजुरी कधी मिळणार असा प्रश्‍न उपस्‍थित होत आहे. योजनांच्‍या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात पीएमआरडीए प्रशासन गती देणार का हे पहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT