पिंपरी-चिंचवड

आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ईव्ही टेक्निशियन कोर्स

CD

पिंपरी, ता. ५ ः जीआयझेड जर्मन चेंबर, डॉन बॉस्को आयटीआय, मोरवाडी आयटीआय व टाटा मोटर्स यांच्या वतीने इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन व मेकॅनिकल मोटर व्हेइकल या ट्रेड्सच्या विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचा अद्ययावत ईव्ही टेक्निशियन कोर्स शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
याबाबतचे चर्चासत्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोरवाडी येथे पार पडले. यावेळी टाटा मोटर्सचे सुशील वारंग, डीजीएम स्किल्स डेव्हलपमेंट सीव्ही प्लांट, शशिकांत रोडे, डीजीएम स्किल्स डेव्हलपमेंट पीव्ही प्लांट, जीआयझेड जीएमबीएच (जर्मनी)चे तांत्रिक सल्लागार तरुण मस्के, डॉन बॉस्को आयटीआयचे प्राचार्य नीलेश चांदगुडे आदी उपस्थित होते.
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आयटीआय पूर्ण करण्याच्या अगोदरच अद्ययावत ईव्ही प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ईव्ही नेक्निशियन कोर्स साधारण तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करता येणार आहे. हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर व आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स येथे शिकाऊ उमेदवार म्हणून कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स यांच्याकडून दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ईव्ही कोर्स व डिप्लोमा कोर्सेस संपूर्ण विनामूल्य असणार आहे. त्यासोबत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. किसन खरात गटनिदेशक यांनी सूत्रसंचालन केले. अरुण बांबळे, अमोल शिंदे, विशाल रेंगडे, उल्हास कुंभार, जयवंत अनपट व सोमनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चलो मुंबई! शेवटची फाइट, गुलाल उधळूनच परतायचं; जरांगेंचा सरकारला इशारा, २९ ऑगस्टला कसं असेल नियोजन

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! बटाट्यासह शिजवलेला बेडूक, भातात किडे, कडू चपात्या अन्...; वसतिगृहातील मेनू पाहून बसेल धक्का

प्राईम व्हिडिओ आणि मॅडॉक फिल्म्सचा मोठा निर्णय: ८ मेगा चित्रपटांसाठी मल्टी-ईयर डील, भारतीय सिनेमाचा ग्लोबल विस्तार!

Latest Marathi News Updates : गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेकडे मागणी

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

SCROLL FOR NEXT