पिंपरी-चिंचवड

हडपसर-यवत, तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग रुंदीकरणाला गती

CD

पिंपरी, ता. ५ : हडपसर ते यवत आणि तळेगाव - चाकण - शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणाला गती मिळाली आहे. राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार २५० कोटी रुपये खर्चाच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामाला विशेष प्राधान्य दिले. दोन स्वतंत्र भागांमध्ये ही विकास कामे हाती घेण्यात येणार आहेत.
हडपसर - यवत सहा पदरी महामार्गासाठी तीन हजार १४६.८५ कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. या रस्त्यामुळे पुणे शहराच्या पूर्व भागातील रहदारीला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच तळेगाव - चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर चाकणपर्यंत चार पदरी आणि पुढे सहा पदरी रस्त्यांसाठी ३ हजार १२३.९२ कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि यवत हे परिसर औद्योगिक आणि निवासी दृष्टिकोनातून विकसित होणाऱ्या या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्र, वसाहती, आयटी हब आणि नागरी वस्त्यांची ‘कनेक्टिव्हिटी’ वाढून वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पुणे, रायगड, अहिल्यानगर, नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यातील नागरिकांना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा लाभ होणार आहे.

हडपसर - यवत आणि तळेगाव - चाकण - शिक्रापूर महामार्गांच्या रुंदीकरणामुळे पुणे जिल्ह्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. विशेषतः चाकण, शिक्रापूर, तळेगाव औद्योगिक वसाहती आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी ही ‘कनेक्टिव्हिटी’ अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुती सरकारने हे प्रकल्प वेगाने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. निविदा प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला तातडीने सुरुवात व्हावी, ही आमची आग्रही मागणी आहे.
- महेश लांडगे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Ajit Pawar:'उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले कऱ्हाडच्या वाहतूक कोंडीत'; महामार्गावर वाहनांच्या रांगा; कोल्हापूरऐवजी कऱ्हाडात मुक्काम

Latest Maharashtra News Updates : पंचगंगेचे पाणी पात्रात, पातळी चार फुटांनी घटली; १९ बंधारे पाण्याखाली, ६३ मार्ग बंद

Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी विदर्भातील लाखो कार्यकर्ते मुंबईतील मोर्चात सहभागी होणार; ठोक आंदोलनाची तयारी

Easy Breakfast Recipe: पोहे-उपम्याला पर्याय हवाय? मग फक्त काही मिनिटांतच तयार होणाऱ्या आणि पोटभर अशा सुशिलाची रेसिपी लगेच लिहून घ्या

Nagpur Fake Shalarth ID Scam: ६८० शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार; शालार्थ घोटाळा, बनावट आयडी तयार केल्याचे उघड

SCROLL FOR NEXT