पिंपरी-चिंचवड

संवाद नागरीकांचा

CD

खड्डे नव्हे; चंद्राचा पृष्ठभाग
निगडीमध्ये टिळक चौक हा खड्डेमय झाला आहे. चौकात इतके मोठमोठे खड्डे पडले आहेत की जणू काही चंद्राचा पृष्ठभाग. त्या खड्ड्यांत पाणी साठले की खड्डे झाकले जातात आणि त्यातून वाहन गेले की प्रवाशांना जोरदार दणका, दुचाकीस्वारांना झटका आणि पादचाऱ्यांचे सचैल स्नान होते. हा रस्ता सुधारण्यासाठी एखाद्या पंचवार्षिक योजनेची गरज आहे. देशाने कितीही प्रगती केली तरी कित्येक दशकांपूर्वी, पुण्यातील जंगली महाराज रस्त्यासारखा रस्ता परत बनविण्याएवढे कौशल्य, इच्छाशक्ती आणि मानसिकता दुदैवाने आपल्याकडे राहिलेली नाही.
- शिवराम वैद्य, निगडी
PNE25V29040

गटाराचे पाणी दुकानांत
दरवर्षी काळभोरनगरमधील गटार, नाल्याचे पाणी जय टॉवरच्या तळघरामधील दुकानांमध्ये असेच घुसते आणि सर्व व्यापाऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आमच्या समस्याचे निराकरण करावे.
- गोपाल अजमेरा, काळभोरनगर
PNE25V29039

बसथांब्याजवळील वाहने हटवा
नवी सांगवीमधील कृष्णा चौक येथील सांगवी हॉस्पिटलसमोर असलेल्या बस थांब्यांवर खासगी वाहने, रिक्षा सतत उभ्या असतात. त्यामुळे बस रस्त्यावरच उभ्या राहतात. प्रवाशांना वाहनांच्या गर्दीमधून वाट काढत धावत पळत बस पकडावी लागते. काही दिवसांपूर्वी ‘सकाळ’ ने याविषयी आवाज उठवला होता. पण सांगवी वाहतूक पोलिसांनी थातुरमातूर कारवाई केली. हेच वाहतूक पोलिस मात्र ‘नो पार्किंग’ मधून दुचाकी उचलायला अतिशय तत्परता दाखवतात.
- एस. के. काळे, सांगवी
PNE25V29038

रिक्षाचालकांवर कारवाई करा
गेल्या काही दिवसांपासून तळेगाव रेल्वे स्थानकाबाहेर अशा दुतर्फा रिक्षा उभ्या करुन भर रस्त्यावर प्रवासी भरले जातात. हा वर्दळीचा वीरचक्र चौक आहे. अवैध टप्पे वाहतूक आणि वर वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोर दुचाकींचा बेकायदेशीर वाहनतळ झाला असून संबंधित प्रशासन मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. बहुतांश रिक्षा चालक अतिशय बेदरकारपणे रिक्षा चालवून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करत आहेत. तळेगाव दाभाडे वाहतूक विभागाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
PNE25V29037

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT