पिंपरी-चिंचवड

मालकाच्या खुर्चीवर बसल्याने कामगारावर कात्रीने वार

CD

पिंपरी : कामगार हा मालकाच्या खुर्चीवर बसल्याने मालकाच्या भावाने कामगारावर कात्रीने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना तळवडेतीतील गणेशनगर येथील अभिषेक एन्टरप्रायजेस कंपनीत घडली. याप्रकरणी नीरज हुशार सिंग (रा. गणेशनगर तळवडे, मूळ- उत्तर प्रदेश) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजू नामदेव सोनटक्के (वय ३४, रा. टॉवर लाइन, मोरे वस्ती, चिखली) याला अटक केली आहे. कंपनीला सुट्टी असल्‍याने कामगार नीरज हा मालकाच्‍या खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होता. त्‍यावेळी मालकाचा भाऊ आरोपी सोनटक्‍के हा कंपनीत आला. त्‍याने नीरज याला खुर्चीवर बसलेले पाहिले असता त्‍याने तू मालकाच्या खुर्चीवर का बसलास? असे म्हणून शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील कात्रीने मानेवर वार करून गंभीर जखमी केले.

जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच अल्‍पवयीन मुलांनी एका १८ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रांनी आणि दगडांनी हल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना बावधन येथे घडली. अथर्व अविनाश ढोणे (रा. मुंडे वस्ती, ता. मुळशी, मुळगाव धामणगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्‍यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाच अल्‍पवयीन मुलांवर गुन्‍हा दाखल केला असून त्‍यापैकी चौघांना ताब्यात घेतले आहे. पूर्वी झालेल्‍या भांडणाच्‍या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना पकडून त्‍यांच्‍यावर धारदार शस्‍त्रांनी वार केले. तसेच इतर आरोपींनी दगडाने मारहाण केली.

फ्लॅट विक्रीच्या नावाखाली निवृत्‍त शिक्षकाची फसवणूक
पिंपरी : एका फायनान्समधील लिलावातील फ्लॅट विक्रीस काढल्याचे भासवून एका निवृत्त शिक्षकाची २७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रावेत परिसरात घडली. या प्रकरणी लक्ष्मण विश्वनाथ रणवरे (रा. अमरदीप कॉलनी, ज्योतिबानगर, काळेवाडी) यांनी रावेत पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धनंजय खुशालचंद्र बोरा (रा. विठ्ठलनगर, शिरूर), संजय शामराव रणवरे (रा. तापकीरनगर, काळेवाडी) व अनिल रघुनाथ शेवाळे (रा. पुणे) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे. आरोपींनी फियादीस रावेत येथील एक फ्लॅट लिलावात विकत घेतल्याचे खोटे सांगितले. तो फ्लॅट फिर्यादीस खरेदी करून देत असल्याचे भासवले. आरोपी शेवाळे याने तो एका फायनान्सचा कर्मचारी असल्याचे खोटे सांगून त्याच्या मदतीने फिर्यादीकडून २७ लाख ५० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली.

दुभाजकाला धडकून दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू
पिंपरी : दुचाकी रस्‍ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्‍यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना बावधन येथील चांदणी चौकाजवळ घडली. अक्षय बजरंग शिंदे (वय २२, रा. माउली रेसीडेन्सी, रायकरमळा, सिंहगड रोड, धायरी, पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. तर आदित्य श्रीहरी धपाटे (वय २१, माउली रेसीडेन्सी, धायरी, पुणे) हा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी आदित्य धपाटे याने बावधन पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आदित्य धपाटे व अक्षय शिंदे हे दुचाकीवरून भुगावहून घरी जात होते. दरम्यान, चांदणी चौकाजवळ त्यांची दुचाकी रस्‍ता दुभाजकाला धडकून दोघेही रस्त्यावर पडले. यात आदित्य याच्या हाताला, पायाला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. तर, अक्षय शिंदेच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

पैसे न दिल्याने तरुणावर चाकूने वार
पिंपरी : रस्त्यावर थांबून पैसे मागणाऱ्या मुलीला पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना आकुर्डी-चिंचवड लिंक रोडवर घडली. याप्रकरणी सुजन रमेश मोरे (वय १९, रा. किसन पांढरकर चाळ, आकुर्डी) यांनी निगडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शंकर जगताप (रा. अग्रसेन भवनजवळ, आकुर्डी) याला अटक केली आहे. फिर्यादी हे बँकेतून पैसे काढून जात असताना रस्त्यावर थांबलेल्या एका मुलीने त्यांच्याकडे पैसे मागितले. दरम्यान, फिर्यादीने माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत, असे सांगितले असता जवळच थांबलेल्या आरोपीने त्यांना शिवीगाळ करून ‘तुझे जादा चरबी है, जान से मार देता हूँ’ असे म्हणत चाकूने त्यांच्या पोटात व कंबरेत वार केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता संभ्रम नको...राजकीय युती गरजेचीच! संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका, मुखपत्रातून मनसेला घातलीये 'ही' साद

Shubhanshu Shukla : शुभांशू शुक्ला उद्या पृथ्वीवर परतणार! भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण, कुठे पाहाल लँडींग, जाणून घ्या

Kolhapur : सतेज पाटील यांनी राजेश क्षीरसागरांना डिवचलं, 'त्या' शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जातात का?

Wimbledon 2025: अल्काराझचे सातत्य की सिनिरचे उलटवार? आज रंगणार फायनल

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

SCROLL FOR NEXT