पिंपरी-चिंचवड

गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

CD

पिंपरी, ता. १५ : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका तरुणाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार वाकड व सोलापूर येथे घडली. याप्रकरणी श्रीकांत चंद्रशेखर हिरेमेठ (रा. राजे शिवाजीनगर चिखली) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सौरभ चावला व अजय कुमार आर्या (दोघेही रा. गंगानगर, राजस्थान) यांच्यावर गुन्‍हा दाखल केला. हिरेमेठ यांना ‘सोशल मीडिया’वरील चित्रफितीमुळे चावला आणि आर्या यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यांची भेट घेतली असता हिरेमेठ यांच्याकडून ४५ हजार रुपये रोख स्‍वरूपात घेण्यात आले. त्यानंतर फिर्यादीच्या खात्यावर पाचशे डॉलर जमा झाल्याचा मेसेज आला. त्‍यानंतर रोज रक्कम वाढत असल्याचे दिसत होते. त्यामुळे हिरेमेठ यांनी एक लाख ९९ हजार रुपये आणि एक लाख ९९ हजार ५०० अशी रक्कम जमा केली. त्यानंतर शेअर बाजाराच्या खात्यात डॉलर जमा झाले नाहीत. याबाबत विचारणा केली असता चावला आणि आर्या यांनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच हिरेमेठ यांनी पोलिसांत तक्रार दिली.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT