‘सकाळ एनआयई’, ‘टाटा मोटर्स विद्याधनम’ लोगो वापरावा.
सर्व फोटो आवश्यक, पुणे शहर व ग्रामीणसह तिन्ही आवृत्तींसाठी
---
पिंपरी, ता. १७ : वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी सर्व शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा असून ‘सकाळ एनआयई’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यास मदत होईल. टाटा मोटर्स विद्याधनम या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देत आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. वाचन व लेखन कौशल्याला वाव देणाऱ्या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे प्रतिपादन पिंपरी येथील टाटा मोटर्सच्या समाज विकास विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक लितेश अत्तारदे यांनी केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ एनआयई’ उपक्रमाचा प्रारंभ घोडेगावमधील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत झाले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे घोडेगाव कार्यालय प्रकल्प अधिकारी प्रदिप देसाई , सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनूल कोतवाल, प्रियांका घनवट, पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश दुरगुडे, मालती रासकर, योजक संस्थेच्या संचालिका रेणू इनामदार, शासकीय इंग्रजी माध्यम शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत नाईकडे, गजानन वनारसे, एन. बी. चव्हाण, आर. ए. लोखंडे, द. पा. काळे, कपिल कांबळे, पांडुरंग माळी, एम. जी. येवले, शीतल पवार, अलका चासकर, अविनाश घोलप उपस्थित होते.
खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील ७० शाळांच्या सुमारे पंचवीस हजार विद्यार्थ्यांना या अंकामुळे वाचनाचा लाभ मिळेल. टाटा मोटर्स विद्याधनम व योजक संस्था यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबविला जाणार आहे. सहभागी शाळांमध्ये ‘सकाळ एनआयई’ अंकाचे वितरण होईल. ‘सकाळ एनआयई’चे व्यवस्थापक विशाल सराफ यांनी प्रास्ताविक व संयोजन केले.
---
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे महत्त्वाचे आहे. ‘सकाळ एनआयई’मुळे विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागत आहे. जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय आश्रमशाळांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून योगदान देना आम्हाला आनंद होतो.
- लितेश अत्तारदे, वरिष्ठ व्यवस्थापक, टाटा मोटर्स समाजविकास विभाग, पिंपरी, पुणे
---
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘सकाळ एनआयई’ अंक मिळत असून वाचन व लेखन कौशल्यासाठी त्याचा फायदा होईल. अंक अत्यंत वाचनीय आहे. ‘सकाळ’, टाटा मोटर्स विद्याधनम व योजक संस्थेने यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. शिक्षक व विद्यार्थ्यांना अंकाचा नक्कीच उपयोग होईल.
- प्रदीप देसाई, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव
---
‘सकाळ एनआयई’ उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण अंकाचे वितरण होत आहे. वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.
- रेणू इनामदार, संचालिका, योजक संस्था, पुणे
---
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य शालेय वयातच विकसित होईल. दर शुक्रवारी त्यांच्या ज्ञानात भर पडेल. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अंकाचे वाचन केले पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून अंक अतिशय उत्तमरीत्या तयार केला आहे.
- रूपाली धोका, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, आंबेगाव तालुका
---
घोडेगाव ः शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत ‘सकाळ एनआयई’, टाटा मोटर्स विद्याधनम व योजक संस्था यांच्यातर्फे ''सकाळ एनआयई'' अंक वितरणप्रसंगी प्रदिप देसाई, लितेश अत्तारदे, रेणू इनामदार, सोनूल कोतवाल यांच्यासह सहभागी मुख्याध्यापक आणि विद्यार्थी.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.