पिंपरी-चिंचवड

प्लॅस्टिक, थर्माकोल जाळल्याने द्रुतगती मार्गालगत प्रदूषणात वाढ

CD

सोमाटणे, ता. १८ : उर्से परिसरातील काही कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ प्लॅस्टिक, थर्माकोल व इतर अविघटनशील कचऱ्याची रात्रीच्या वेळी द्रुतगती मार्गालगत होणारी विल्हेवाट आणि त्यानंतर होणारे जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत प्रदूषणाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून, अद्यापही कचरा टाकणाऱ्या आणि जाळणाऱ्या व्यक्तींचा तपास लागत नाही. हा कचरा काही दिवस रस्त्यालगत पडून राहिल्यानंतर पेटवला जातो. यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो, जो एकीकडे रस्त्यालगत पसरतो, तर दुसरीकडे डोंगरांकडे वाहतो.
या धुरामुळे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. तसेच डोंगरांकडे जाणाऱ्या धुरामुळे झाडांची पाने, फुले वाळू लागली आहेत. द्रुतगती मार्गालगतच्या चौराई डोंगर परिसरात मोर, भेकर, सांबर, डुक्कर, ससे यांसारखे वन्यप्राणी तसेच सरपटणारे प्राण्यांचे वास्तव्य असून, या धुरामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. तरी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
PNE25V32338
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Impact: युद्धाचे परिणाम! नाशिकमधल्या ४०० कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर; संभाजीनगरमधले उद्योजक म्हणतात, कोरोनासारखी परिस्थिती...

तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रात ५,५०६ पदांसाठी मेगा प्राध्यापक भरती होणार; तारीख सांगून महायुती सरकारचा मोठा निर्णय

Iran War: युद्धाचा परिणाम इंटरनेटवरही! भारतात नेट बंद होण्याची शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात?

इतिहासात लपून गेलय 'हे' ठिकाण जिथे श्रीकृष्ण अन् सुदामाची झालेली भेट; मूठभर पोहे बनले छप्पन भोग, आयुष्यात एकदातरी नक्की द्या भेट

माझ्या घटस्फोटादरम्यान बाबा एखाद्या मित्रासारखे सोबत होते... शर्मिष्ठा राऊतने वडिलांबद्दल केला भावुक खुलासा

SCROLL FOR NEXT