पिंपरी-चिंचवड

‘सुरमयी शाम’ला रसिकांचा प्रतिसाद

CD

पिंपरी, ता. १८ ः रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सुरमयी शाम’ कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध झाले. चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या सांगितिक कार्यक्रमात गायक संदीप उबाळे, धवल चांदवडकर, गायिका सन्मिता धापटे, कोमल कृष्णा यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा दीपा जावडेकर, मावळते अध्यक्ष अजय लंके, दीपा लंके, मावळते सचिव भूषण ढाके, माजी अध्यक्ष विलास गावडे, बालवीर चावला, अदिती जोशी, सुनील कुलकर्णी, रजनी द्विवेदी आदी क्लबचे सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला निधी ग्रामीण शाळेसाठी खर्च केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी गायकांनी सादर केलेल्या ‘आजा आजा मैं हूं प्यार तेरा’,‘ तुम जो मिल गये हो’, ‘हंगामा हो गया..’, ‘मन क्यू बहका’ अशी गोड गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तर गिटार व सॅक्सोफोन या वाद्यांच्या जुगलबंदीने कार्यक्रमात रंगत आणली. महेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. दीपा जावडेकर यांनी आभार मानले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT