पिंपरी-चिंचवड

विकास अनाथाश्रमात साहित्य, खाऊ वाटप

CD

पिंपरी, ता. १८ ः वाढदिवस म्हणजे केवळ आनंदोत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी असते, ही भावना ‘सकाळ यिन’ च्या माध्यमातून दरवर्षी जपली जाते. याचा आदर्श ठेवत यंदाही चिखलीच्या विकास अनाथाश्रमात शालेय साहित्य व खाऊ वाटप उपक्रम राबविण्यात आला.
‘सकाळ यिन’चे कॅबिनेट मंत्री व पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष राजवर्धन करांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमात सुमारे ४० बालकांना या उपक्रमाचा लाभ झाला. या वेळी आश्रमप्रमुख माऊली हर्कल उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी सामाजिक जाणीव असलेल्या ‘यिन’च्या तरुण सदस्यांनी सेवाभावाने योगदान दिले.
अमरसिंह पाटील, रोहन सावंत, अमित देवकर, पार्थ भोंगाने, ओम बसते, शुभम गायकवाड, श्रीराज सावंत, मंथन रेडे, शंभूराजे शिनगारे, प्रशांत बोराटे, आदित्य बागडे, बालाजी नलवडे, अतुल शिंदे, विवेक काळे, राज जेधे, शुभम टापरे, साईराज शेंडगे, प्रतीक कामठे, प्रथमेश कामठे यांनी एकत्र येऊन समाजसेवेचा वारसा पुढे नेला.
करांडे यांनी सांगितले की, या उपक्रमातून तरुणांमध्ये समाजाबद्दलची संवेदनशीलता व जबाबदारीची भावना अधिक दृढ होते. त्यामुळे नेतृत्वगुण आणि सेवाभाव एकत्रित रुजवात. हे या उपक्रमाचे खऱ्या अर्थाने यश आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT