पिंपरी-चिंचवड

संवाद माझा

CD

दिघी दत्तनगर बस थांब्याची दुरुस्ती आवश्यक
आळंदीहून पुण्याकडे जाताना दिघी दत्तनगर येथील पीएमपी बस थांब्याची आसनव्यवस्था तुटलेली आणि धोकादायक अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोय होत आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही तेथे बसता येत नाही. या आसन व्यवस्थेची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित व आरामदायक सुविधा मिळू शकेल.
- निर्गुण थोरे, चऱ्होली बुद्रुक
PNE25V32431

बीआरटी मार्गात अन्य वाहने
पुणे-मुंबई महामार्गावर काही ठिकाणी बीआरटी मार्गावरून बसवाहतूक सुरू आहे. पण, काही खासगी वाहनचालक बीआरटी मार्गात येत आहेत. नो पार्किंगमधील दुचाकी उचलण्यात जेवढी कार्यक्षमता दाखवली जाते, तेवढी बीआरटी मार्गात येणाऱ्यांविरोधात दाखवली जात नाही.
-शिवराम वैद्य, निगडी
NE25V32433

दिघीतील पर्यायी मार्ग वापरावा
जुना दिघी रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे सर्व दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण रस्ता बांधकाम कामगारांना सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस त्रास सहन करावा लागत आहे. कारण, याच मार्गाचा अवलंब दिघीमध्ये राहणारे लोक करतात.
-नितीन लावंड, भोसरी
PNE25V32435

बंद दिवे दुरुस्त करावेत
पिंपळे निलख येथील विशालनगर डीपी रस्त्यावरील शिल्पा हॉटेल ते जगताप चौक (जगताप डेअरी) या दरम्यान काही पदपथ दिवे आणि पथदिवे बंद; तर काही दिवे मंद प्रकाश देत आहेत. तरी महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाने संबंधित तक्रारीचे दाखल घ्यावी.
- सनी शिंदे, पिंपळे निलख.
PNE25V32432

बॅरिकेड काढल्याने अपघाताचा धोका
घरकुल, चिखली जवळील सेवा रस्त्यावरून स्पाइन रस्त्याशी जोडणारा एक बॅरिकेड अलिकडे काढण्यात आला आहे. ज्यामुळे त्या ठिकाणी एक नवीन एन्ट्री/एग्झिट पॉइंट निर्माण झाला आहे. रस्ता हा निगडीकडून वेगाने येणाऱ्या वाहतुकीसाठी प्रसिद्ध असून, या बिनधास्त वाहतुकीच्या थेट प्रवेशामुळे अपघाताचा धोका आहे. हा एन्ट्री/एक्झिट पॉइंट नियोजित, अधिकृत आणि सुरक्षित नसल्याने या ठिकाणी रहिवाशांना तसेच अन्य वाहनचालकांना धोका पोहोचत आहे.
- आशिष अलोणी, घरकुल, चिखली

NE25V32434

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा लालबाग परिसरातून पुन्हा लालबाग गेटजवळ आला

India's All-Time T20I XI : रोहित, विराट, सूर्या संघात; कर्णधार मात्र वेगळाच, आशिया चषकापूर्वी पाहा भारताचा ऑल टाईम ट्वेंटी-२० संघ

MiG-21 retirement: तब्बल सहा दशकांहून अधिक काळ देशाचे रक्षण केल्यानंतर आता ‘मिग-21’ निरोप घेणार

Mumbai Water Level: वर्षभराची चिंता मिटली! गणपती विसर्जनाच्या दिवशी मुंबईतील धरणे फुल्ल; आकडेवारी आली समोर

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ कुरळे ब्रदर्स घेऊन येताहेत हास्याचा डबल धमाका! 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT