पिंपरी-चिंचवड

पार्सलमध्ये एमडी असल्याचे सांगत महिलेची चार लाखांची फसवणूक

CD

पिंपरी : पार्सलमध्ये एमडी असल्याचे सांगत एका महिलेची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘तुमचे इराणला पार्सल जात असून त्यात १५ किलो जनरिक मेडिकल आणि १५ ग्रॅम एम.डी. असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांचा आधार कार्ड क्रमांक मागवून स्काय ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर युनिफॉर्ममधील दोन पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. फिर्यादीचे आयसीसीआयसी बँक खाते इतर दोन व्यक्तींशी लिंक असून त्याद्वारे मनी लाँड्रिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले. आय.बी.आय. क्लिअरन्स आणि पोलिस व्हेरिफिकेशनसाठी आयसीआयसी बँकेच्या ॲपवर प्रक्रिया करण्यास सांगून त्यांच्या खात्यावर ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज काढून महिंद्रा बँक खाते आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यांवर प्रत्येकी दोन लाख रुपये असे एकूण चार लाख रुपये ऑनलाईन स्वीकारून फसवणूक करण्यात आली.

पैसे न दिल्याने चाकूने वार
पिंपरी : पैशाच्या कारणावरून एका व्यक्तीला शिवीगाळ करीत मारहाण करून चाकू मारून जखमी करण्यात आले. ही घटना निगडी येथील म्हाळसाकांत चौकात घडली. या प्रकरणी सिद्धेश्वर जयराम मस्के (रा. चिखली) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक दयानंद बोडके (वय २२, रा. मोरे वस्ती, चिखली) आणि त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे फिर्यादी काम करत असलेल्या टपरीवर आले. त्यांनी फिर्यादीकडे खर्चासाठी पैसे मागितले. फिर्यादीने विरोध केल्याने आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली आणि त्यांच्याजवळील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या करंगळीवर मारून जखमी केले.

गाड्यांची तोडफोड करून चोरी
पिंपरी : गाड्यांची तोडफोड करून कागदपत्रे चोरल्याचा प्रकार वाकड येथील माउली चौकात घडला. या प्रकरणी विशाल उर्फ साकी संजय गायकवाड (रा. माउली चौक, वाकड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नीलेश शंकर वाघमारे आणि पाच बॉडीगार्डवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे पाच बॉडीगार्ड फिर्यादीच्या घराजवळ आले आणि त्यांनी फिर्यादीला मोकळ्या जागेत त्यांच्या गाड्या न लावण्यास सांगितले. ‘‘ही तुझ्या बापाची जागा नाही, सर्व गाड्या काढून टाक नाहीतर आम्ही तुझ्या सर्व गाड्या फोडून टाकू. तसेच तुझ्या कुटुंबाला या जागेतून घेऊन जा आणि जागा खाली कर नाहीतर तुला मारून टाकू,’’ अशी धमकी दिली. त्याच दिवशी सायंकाळी आरोपी आणि त्याचे पाच बॉडीगार्ड, ज्यात दोन महिला आणि तीन पुरुष होते, त्यांनी फिर्यादीच्या ताब्यात असलेल्या सर्व्हे नं १६९/४ जमिनीत प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीच्या मालकीच्या टँकर आणि ट्रकची तोडफोड केली आणि टायरची हवा सोडून दिली. तसेच, ट्रकच्या क्लीनर बाजूच्या दरवाजाची काच फोडून आत शिरले. फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यातील १४ हजार ५०० रुपये, गाडीची कागदपत्रे, चलनबुक, बिल बुक चोरून नेले.

गांजा बाळगणाऱ्या एकाला अटक
पिंपरी : गांजा बाळगणाऱ्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई भोसरी येथील गावजत्रा मैदानाच्या मागील बाजूला करण्यात आली. गोविंद गंगाराम घुले (वय ३१, रा. कातवी, मावळ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भोसरी येथील गावजत्रा मैदानाच्या मागील बाजूस एकजण गांजा विक्रीसाठी आला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गोविंद घुले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९७ हजार रुपये किमतीचा १ किलो ९५४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President election 2025: उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी अपडेट! आता ‘या’ दोन पक्षांनी टाकला मतदानावर बहिष्कार

Uran Fire: मोठी बातमी! सरकारच्या ताब्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पात भीषण आग, उरणमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Updates : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यावरून ओबीसी समाज प्रचंड नाराज

Yermala Crime : सोलापूर-धुळे महामार्गावर चालत्या ट्रकमधून दिवसाढवळ्या चोरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल; मागील चालकांनी केला प्रतिकार, तरीही चोरटे फरार

1.14 लाखांचा दंड ! विमानात जाईचा गजरा घालून प्रवास करणं अभिनेत्रीला पडलं महागात

SCROLL FOR NEXT