पिंपरी, ता. १८ ः आर्थिक दुर्बल घटकांसाठी महापालिकेने चिखली येथे राबवलेल्या घरकुल योजनेतील घरांसाठी मिळकतकर आकारणी (घरपट्टी) रद्द करावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरकूल प्रकल्प उभारला आहे. त्यात १६० इमारती असून, सहा हजार ७२० कुटुंबांना निवारा मिळाला आहे. येथील सर्व कुटुंबे आर्थिक दुर्बल घटकातील असल्याने रोजंदारीने काम करून पोट भरणारी आहेत. या सर्वांचे जीवनमान अत्यंत दुबळे आहे. मुलांचे शिक्षण, घराचे बँकेचे हप्ते यामुळे त्यांची परिस्थिती नाजूक आहे. वास्तविक, मुंबई महापालिका अधिनियम कलम १४० मधील उपकलम (१) नुसार निवासी इमारती किंवा निवासी सदनिका चटई क्षेत्र ४६.४५ चौरस मीटर (५०० चौरस फूट) किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या निवासी इमारती किंवा निवासी सदनिकांनाकर आकारणी करण्यात येऊ नये. या नियमानुसार, आर्थिक दुर्बल घटकांतील कुटुंबांच्या चिखली घरकूल योजनेतील सदनिका ३६.७७ चौरस मीटर (३९५.६५ चौरस फूट) आहेत. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही मुंबई महापालिका अधिनियमानुसार कर आकारणीतून त्यांना कायमस्वरूपी मुक्तता द्यावी.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी उभारलेल्या घरकूलमध्ये गोरगरीब- कष्टकरी नागरिक वास्तव्य करतात. मुंबई महापालिका नियमाप्रमाणे चिखली घरकुलमधील सदनिकाधारकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून आकारण्यात येणारी घरपट्टी (मिळकत कर) रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यासाठी सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा करणार आहोत.
- महेश लांडगे, आमदार, भाजप, भोसरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.