पिंपरी-चिंचवड

‘ईएसआय’ रुग्णालयाची वसाहत कागदावरच

CD

पिंपरी, ता. १९ ः कामगार रुग्णांना चोवीस तास सेवा देण्यासाठी राज्य कामगार विमा रुग्णालयात (इएसआयसी) तीन पाळ्यांमध्ये वैद्यकीय कर्मचारी सक्रिय असणे आवश्यक असते. यात रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांसाठी रुग्णालयाच्या आवारातच निवासाची सोय करणे गरजेचे ठरते. त्यामुळे येथील साडेचार एकर जागेत प्रस्तावित निवासी वसाहत बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना मोफत रुग्णसेवा देण्यासाठी केंद्राच्या सहकार्याने राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मोहनगरमधील ‘ईएसआय’ रुग्णालयात अत्याधुनिक सेवा देणार आहे. त्याचा आराखडा आरोग्य विभागाने तयार केला असून अंमलबजावणी सुरु आहे.
त्यासाठी रुग्णालयातील विविध विभागांतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली आहेत. नवीन कर्मचारी महिनाभरात नियुक्त होणार आहेत. त्यानंतर रुग्णालय तीन पाळ्यांमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यरत होणार आहे. रात्रपाळीतील वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी प्रस्तावित वसाहत लवकर बांधून पूर्ण होणे आवश्यक आहे.
--------
दोन वर्षे उलटूनही प्रकल्प कागदावरच
‘ईएसआय’ रुग्णालयाच्या आवारात निवासी वसाहत आराखडा बनवून राज्य कामगार विमा सोसायटीने केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (सीपीडब्ल्यूडी) प्रस्ताव दाखल केला. त्यावर ‘सीपीडब्ल्यूडी’च्या पथकाने २०२२ मध्ये जागेचे सर्वेक्षण करून परिक्षणासाठी भूगर्भाचे नमुने घेतले. याला दोन वर्षे उलटली आहेत. रुग्णालयाच्या अत्याधुनिकीकरणाचा मुद्दा समोर आल्यानंतर वसाहतीची समस्या तीव्र होणार आहे.
--------
प्रस्तावित इमारतीचे स्वरूप
- प्रकल्पाची जागा ः साडेचार एकर जागेवर निवासी वसाहतीची इमारत असणार.
पहिल्या मजल्यावरील सोय ः अतिथिगृह
निवासाची सोय ः दुस-या मजल्यापासून १, २ आणि ३ बीएचके सदनिका
घरांची विभागणी ः वर्ग चारसाठी १ बीएचके, वर्ग तीनसाठी २ बीएचके, डॉक्टरांसाठी ३ बीएचके
इमारतीचा परिसर ः सुसज्ज वाहनतळ, कॅन्टीन, उद्यान
प्रकल्पाची प्रस्तावित किंमत ः १५० कोटी रुपये
-------
रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्तांनीही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा सुधारण्यावर भर दिला आहे. आता नवीन वैद्यकीय अधिकारी नियुक्त होणार आहेत. रुग्णालयाच्या साडेचार एकर जागेत डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक वसाहत प्रस्तावित आहे. राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
- डॉ. वर्षा सुपे, चिकित्सा अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

SCROLL FOR NEXT