पिंपरी-चिंचवड

लायन्स क्लब निगडीच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

CD

पिंपरी, ता. १९ ः कौशल्य विकासअंतर्गत लायन्स क्लब ऑफ पूना निगडीने ‘जागतिक युवा कौशल्य’ दिनाचे औचित्य साधून ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य कसे मिळवावे व ते कसे वृद्धिंगत करावे, यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. अशोक येवले यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्षा रश्मी नायर, उषा येवले, मंजिरी कुलकर्णी, जयश्री मांडे, शिल्पी कुमार, नंदकुमार जगदाळे आदी कार्यशाळेच्या आयोजक उपस्थित होते.
येवले म्हणाले, ‘‘१५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा करावा असे जागतिक संघटनेने डिसेंबर २०१४ मध्ये एका ठरावाद्वारे जाहीर केले. त्यास अनुसरून २०१५ पासून दरवर्षी नावीन्यपूर्ण घोषवाक्य घेऊन जगभरात युवा कौशल्य दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. २०२५ -२६ मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल स्किल्सच्या माध्यमातून कुशल उद्योजक व कारागीर घडविण्याचे जागतिक संघटनेने जाहीर केले.’’
‘युनिक स्किल डेव्हलपमेंट संस्था, चिंचवड आणि भारतीय टेक्निकल इन्स्टिट्यूट निगडी येथे मशिनिस्ट घडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कारखान्यांसाठी लागणाऱ्या मशिनमध्ये वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. हे तंत्रज्ञान वेळोवेळी अवगत करून नोकरीतील उच्चपदापर्यंत जाण्याच्या संधी कौशल्य विकासाच्या माध्यमातून मिळविण्याचे मार्गदर्शन अशोक येवले यांनी उपस्थितांना केले. अध्यक्षा रश्मी नायर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमिताभच्या ‘डॉन’चा दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड! चंद्र बरोट यांचं निधन, फुफ्फुसाच्या आजाराशी सात वर्षांची झुंज संपली!

Gutka Smuggling: पावणेचार लाखांच्या गुटख्यासह १३ लाखांचा ऐवज जप्त

Amravati News: लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्याच खात्यात जमा; अमरावती जिल्ह्यात घरकुल योजनेतील प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Gondia Accident: आमदार फुकेंच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; चालकाचा मृत्यू, हिरडामाली येथील घटना, काही काळ तणाव

Hand Health Signs: हात देत आहेत शरीरातील आजारांचे संकेत? हे 6 बदल लगेच ओळखा आणि त्यावर उपाय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT