पिंपरी-चिंचवड

‘एमआयडीसी’त आता वर्तुळाकार बससेवा

CD

अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएलने) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चाकण परिसरातील आंबेठाण चौक, स्पायसर चौक, स्कोडा कंपनी, एचपी चौक मार्गे आंबेठाण चौक अशी वर्तुळाकार बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यापासून ही सेवा सुरू होणार आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातही मार्गांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या बस सेवेमुळे एमआयडीसी परिसरातील कामागारांचा प्रवास सुखकर होणार आहे.
शहरालगत भोसरी आणि चाकण येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) क्षेत्र विकसित झाले आहे. चाकण एमआयडीसी परिसर ६०७ एकरावर तर भोसरी एमआयडीसी परिसर ३,५०० एकर इतक्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला आहे. या परिसरात आठ हजारांहून अधिक प्लॉटधारक असून, बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे पाच हजारांहून अधिक लघुउद्योग आहेत. महिंद्रा, स्कोडा, व्हेल्स वॅगन यासारख्या विविध वाहन बनविणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. एमआयडीसी आणि लगतच्या परिसरात दररोज लाखो कामगार काम करतात. पण, अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे स्वतःची वाहने किंवा रिक्षा, ओला, उबेर यासारख्या ॲप आधारित खासगी वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या वाढत असून, वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पीएमपीएमएलने आता एमआयडीसी परिसरात बस सेवा विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्यात चाकण एमआयडीसी परिसरात आंबेठाण चौक ते आंबेठाण चौक या वर्तुळाकार मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. सुमारे सहा बसच्या माध्यमातून ही बस सेवा दिली जाणार आहे.

असा असेल वर्तुळाकार मार्ग
आंबेठाण चौक (चाकण), स्पायकर चौक, स्कोडा कंपनी, व्हेल्स वॅगन कंपनी, सॅमी कंपनी, महिंद्रा मटेरिअल गेट, एचपी चौक, महांळूगे, खराबवाडी, चाकण आणि आंबेठाण चौक.

एमआयडीसीत सुरू असलेली बस सेवा (मार्ग क्रमांक)
- पिंपरी आंबेडकर चौक ते महाळुंगे इंडोरन्स कंपनी (१२०)
- पिंपरी ते भोसरी (३०२)
- चिंचवड ते भोसरी (३०४)
- पिंपळे सौदागर ते भोसरी (३३१)
- आळंदी ते हिंजवडी (३२७)
- वायसीएम रुग्णालय ते आळंदी (३६२)
- भोसरी ते राजगुरुनगर (३५८)
- भोसरी ते वासुली (३५८ अ)
- पिंपळे गुरव ते राजगुरुनगर (३५९)
- दावडी ते भोसरी (३७०)
- निगडी ते आंबेठाण चौक (३१४)
- निगडी ते वासुली (३६९)

एमआयडीसी परिसरात धावणाऱ्या बस
एकूण बस ः ८१
एकूण फेऱ्या ः ५१८
अंदाजे प्रवासी संख्या ः ७० ते ८० हजार

एमआयडीसीतील वर्तुळाकार बस सेवेसाठी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आंबेठाण चौकातून क्लॉक वाइज और एंटी क्लॉक वाइज बस सुटणार आहेत. त्यामुळे एमआयडीसीत काम करणाऱ्या कामगारांना बस सेवा उपलब्ध होणार आहे.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

पीएमपीएमएल बससेवा सुरू झाल्यास कर्मचाऱ्यांना नक्कीच फायदा होईल. पण, वाहतूक कोंडीमुळे कर्मचाऱ्यांना तासनतास अडकून पडावे लागत आहे. त्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत.
- प्रमोद बाबर, उद्योजक, चाकण

एमआयडीसीत काम करणाऱ्या महिलांना प्रामुख्याने वाहतूकची समस्या भेडसावते. सध्या सुरू असलेल्या बस फक्त मेनरोडवरुन धावतात. अंतर्गत भागात बस नसल्यामुळे कामगारांना चालत जावा लागते. रात्री उशीर झाल्यास लुटमारीच्या घटनाही घडल्या आहेत. आता बस सेवा सुरु झाल्यास कर्मचाऱ्यांना सुरुक्षित प्रवास करता येईल. चाकण प्रमाणे भोसरी एमआयडीसीतही अंतर्गत भागात बस सेवा सुरू करावी.
- संजय भोसले, उद्योजक, भोसरी

एमआयडीसीतील अंतर्गत भागात पीएमपीएमएल बस नसल्याने आम्हाला रिक्षा किंवा ओला, उबेरने प्रवास करावा लागत होता. पण, आता बस सेवा सुरू होणार असल्याने आम्हाला दिलासा मिळणार आहे. पैंशाचीही बचत होईल.
- अमोल जगताप, कर्मचारी

एमआयडीसीत रात्री बस किंवा रिक्षा उपलब्ध नसल्यामुळे खासगी वाहनाने प्रवास करावा लागायचा. ऑनलाइन रिक्षा बुकिंग केल्यावरही बरेच रिक्षा चालक भाडे नाकारतात. बस सेवा सुरू झाल्यास नक्कीच माझ्यासारख्या हजारो कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
- शशिकांत सातपुते, कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati Visarjan Rath: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रथ सज्ज

Ajit Pawar : अजितदादांचा नादच खुळा! पुण्याच्या गणपती मिरवणुकीत उपमुख्यमंत्र्यांनी वाजवला ढोल; कसबा गणपतीच्या पालखीलाही दिला खांदा

Latest Maharashtra News Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Ganpati Visarjan 2025 Live Updates : जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी येण्यास सुरुवात

Miraj Ganpati Visarjan : मिरजेत गणरायाची बैलगाडीतून विर्सजन मिरवणूक, काय आहे वैशिष्ट्य जाणून घ्या

SCROLL FOR NEXT