शाहूनगर येथील अभिषेक विद्यालयम् मध्ये विद्यार्थ्यांना पावसाचा आनंद व पावसाळा ऋतूची माहिती देण्यासाठी ‘वेलकम टू दि रेनी सीजन’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये होणारे निसर्गातील बदल व या ऋतूत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी छत्री व रेनकोट याचा वापर करून पावसाचा आनंद घेत पावसामध्ये मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. त्याचबरोबर पावसाळी वातावरणाचे हुबेहूब चित्र डोळ्यापुढे आणण्यासाठी वर्गखोली पावसाळा ऋतूप्रमाणे सजवण्यात आली होती. त्याअंतर्गत वर्गामध्ये धबधबा, होडी, बेडूक, झाडे-वेली, ढग, पावसाचे थेंब यांचा वापर करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापकीय सुरेश कसबे, मनीषा कसबे, ऋतुजा कसबे, वैभव कसबे, मुख्याध्यापिका पूर्व प्राथमिक मेघा इंगोले, प्राथमिक विभाग शिल्पा क्षीरसागर, माध्यमिक विभाग कविता भोसले, कनिष्ठ विद्यालय प्राचार्या प्रेमा जोशी आदी उपस्थित होते.
सीएमएस शाळा
निगडी येथील सीएमएस हायर सेकंडरी स्कुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन प्रशासकीय अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त (निवृत्त) बॅडमिंटन खेळाडू मनोहर जोशी, सीएमएसचे अध्यक्ष टी. पी. विजयन, सरचिटणीस सुधीर नायर, खजिनदार पी. अजय कुमार, कलावेदी प्रमुख पी. व्ही. भास्कर, व्ही. के. रामकृष्णन, जी. एस. नायर, मुख्याध्यापिका बीजी गोपकुमार, चैताली लोंढे उपस्थित होते. या स्पर्धेत ३६ शाळांतील १५६ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी क्रिडा शिक्षक सोनाली पवार, सुजाता गायकवाड, हरिहरण श्रीधरण यांनी विशेष परिश्रम घेतले.
सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक
सिंधूनगर निगडी प्राधिकरणातील श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक शिक्षक संघ व माता पालक संघ सभा गोविंद दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली. यावेळी सरस्वती विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या संगीता गुरव, पर्यवेक्षक संजय कांबळे, शिक्षकपालक संघाचे प्रतिनिधी अशोक भोरे उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा परिचय अर्चना बुधकर यांनी करून दिला. बेंडाळे यांनी पालक शिक्षक संघ व माता पालक संघाचे महत्त्व विषद करतानाच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाची माहिती दिली. यावेळी शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी अशोक भोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कैलास पोंदे यांनी केले. यावेळी ४४ पालक उपस्थित होते.
श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर
श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर आकुर्डी या शाळेमधील शालेय व्यवस्थापन, माता व शिक्षक पालक संघ, सखी सावित्री, महिला तक्रार निवारण, परिवहन, बांधकाम, विद्यार्थी सुरक्षा इत्यादी समित्यांची सभा शाळेमध्ये पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव गोविंदराव दाभाडे उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्याध्यापक राजू माळे, शैलजा मोरे, कुंदन दाभाडे, प्रांजल गंगवाल, कुणाल बसर्गी, अहेमद पठाण, दामिनी पथक निगडी विभाग वैशाली खेडकर, मनिषा लोखंडे, प्रियंका बच्छाव तसेच विविध समित्यांवर नियुक्त सर्व सदस्य उपस्थित होते. सर्व सदस्यांना अभिनंदन पत्रे देवून गौरविण्यात आले. प्रास्ताविक सुहासिनी वैद्य, निवेदन नंदा पाटील यांनी केले. मनोगत भारती भोंगाडे यांनी तर आभार अमोल गुंड यांनी मानले.
मॉडर्न हायस्कूल
यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलमधील स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण बचतीचा संदेश देत वृक्षारोपण केले. शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी कोरफड, तुळस, जास्वंद, नारळ, चाफा या झाडांची शालेय परिसरात लागवड करण्यात आली. स्काऊट गाइड प्रमुख आशा कुंजीर आणि उपप्रमुख शिवाजी अंबिके यांनी संयोजन केले. यावेळी उमा बिर्जे, उमरफारूक शेख उपस्थित होते. मुख्याध्यापिका शारदा साबळे, कमल घोलप, पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी वृक्षारोपण केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा. मानसिंग साळुंके, व्हिजिटर प्रमोद शिंदे, राजीव कुटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
अभिषेक इंटरनॅशनल स्कूल
मोशी येथील अभिषेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’ उत्साहात व सर्जनशीलतेने साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करणे व निसर्गप्रेमाची भावना वाढवणे हा होता. शाळा परिसर संपूर्ण हिरव्या रंगात नटलेला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने निसर्गाचे सौंदर्य विविध चित्रांतून दाखवले. झाडे, फुले, पर्वत, नद्या यांसारख्या दृश्यांनी भरलेली ही चित्रे पर्यावरणाच्या सौंदर्याची साक्ष देत होती. घोषवाक्य लेखन स्पर्धा घेण्यात आली. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन व हरित जीवनशैली या विषयांवर घोषवाक्ये तयार केली. ही प्रेरणादायी घोषवाक्ये शाळेच्या भिंतींवर लावण्यात आली, ज्यामुळे पर्यावरणाविषयी जागरूकतेचा प्रसार झाला. यावेळी अध्यक्ष गुरुराज चरंतीमठ, कार्यकारी संचालिका गीता चरंतीमठ, शाळा प्रमुख सुधा भट, महाविद्यालय प्राचार्य वर्षा देसाई उपस्थित होते.
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल
हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलमधील शिक्षकांचा हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक एकनाथ बुरसे, उपशालप्रमुख आशा माने, रमेश गाढवे, अनिता भामरे तसेच मुकेश पवार यांचा सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष सुमित घाटे, उपाध्यक्ष सन्मान घाडगे, प्रतीक पाटील, किरण लोखंडे, अक्षय साळुंखे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.