पिंपरी-चिंचवड

‘टीक्यूएम कन्व्हेन्शन २०२५’ स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

CD

पिंपरी,ता. २४ : कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट ( टीक्यूएम ) कनव्हेन्शन २०२५ या स्पर्धेला स्पर्धकांचा उतस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जो ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उत्पादने, सेवा आणि प्रक्रियांच्या गुणवत्तेत सतत सुधारणा करण्यासाठी उद्योग संस्थांनी अधिक पुढाकार घ्यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मोडमध्ये करण्यात आले होते.

या स्पर्धेतील सहभागी प्रकल्पांचे सादरीकरण भोसरीतील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे नुकतेच झाले. तर व्हर्च्युअल सादरीकरण २८ जुलैला होणार आहे. या स्पर्धेत ३८ उद्योग संस्थांमधील एकूण २८५ जणांनी भाग घेतला. केस स्टडी, स्लोगन आणि पोस्टर या श्रेणींमध्ये ११६ नामांकने प्राप्त झाली. सहभागी संस्थांच्या सदस्यांनी या श्रेणींमध्ये त्यांच्या नोंदी सादर केल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कमिन्स इंडिया लिमिटेडचे राजेंद्र कुलकर्णी यांनी केले.
समारोप सत्राला टाटा मोटर्स लिमिटेडचे नितीन कलमकर उपस्थित होते. यावेळी पुणे चॅप्टर कौन्सिल सदस्य डॉ. अजय फुलंबरकर, अनंत क्षीरसागर, धनंजय वाघोलीकर आणि परवीन तरफदार उपस्थित होते. केस स्टडी प्रेझेंटेशनचे स्पर्धाचे परीक्षण रितू मेहता, भबानी नाईक, शिरीष शनाणे, डॉ. संजय लकडे, चंद्रशेखर बापट, महादेव लोहार, मनीष फाळे आणि राहुल काशीकर यांनी केले. घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धाचे परीक्षण धनंजय वाघोलीकर आणि परवीन तरफदार यांनी केले. सहभागी उद्योग संस्थामधील यशस्वी संघांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. क्यूसीएफआयच्या पुणे विभागाचे रहीम मिर्झा बेग , प्रशांत बोराटे, चंद्रशेखर रूमाले यांनी स्पर्धेचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात! सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू

IND vs ENG 4th Test: बेन स्टोक्सचे खणखणीत शतक! भारतीय गोलंदाज प्रयत्न करून दमले, इंग्लंडसाठी नवा इतिहास रचला

Mumbai Rain: मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण, मुंबईकरांचे हाल; पालिकेचे दावे फोल

Shukra Bhraman 2025 : मिथुन राशीतील शुक्राचं भ्रमण या राशींना देणार भरपूर लाभ; राशीनुसार जाणून घ्या परिणाम

Manikrao Kokate : 'रमी' वाद भोवला: धुळ्यात कृषिमंत्री कोकाटे यांना काळे झेंडे व पत्त्यांच्या माळा दाखवून निषेध

SCROLL FOR NEXT