पिंपरी-चिंचवड

भीमाशंकर, त्र्यंबकेश्‍वरसाठी श्रावणात एसटीच्या जादा गाड्या

CD

पिंपरी, ता. २३ ः श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातर्फे त्र्यंबकेश्‍वर आणि भीमाशंकरसाठी जादा गाड्या सोडण्यात येतील.
वल्लभनगर (पिंपरी) आणि शिवाजीनगर येथून या गाड्या सुटतील. १९ ऑगस्ट पर्यंत शिवाजीनगर आगारातून पहाटे ३.३० ते दुपारी चार पर्यंत दर एका तासाला आणि वल्लभनगर आगारातून शुक्रवार ते मंगळवार दरम्यान जादा गाड्यांचे नियोजन आहे.
श्रावणात दर सोमवारी आणि आठवड्याच्या शेवटी शनिवार, रविवारी भीमाशंकरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच भीमाशंकरला पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील अधिक असते. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मागील काही वर्षांच्या तुलनेत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही ठिकाणांच्या गाड्यांचे आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. त्यामुळे प्रवाशांनी नजीकच्या आगारावर जाऊन आरक्षण करावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
---

श्रावणात भाविक देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने विविध मंदिरांमध्ये जातात. त्र्यंबकेश्‍वर आणि भीमाशंकर येथे ज्योतिर्लिंग असल्याने त्यासाठी जादा गाड्या सोडण्यात येतील. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे विभाग
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Shashikant Shinde : सध्याचे सरकार हे राज्याची तिजोरी रिकामी करून आलेले सरकार; महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे दिले आदेश

Narayangaon Crime : लूटमार करणाऱ्या तीन गावगुंडांवर गुन्हा दाखल; दोन आरोपींना अटक

Indapur News : क्रिकेट खेळताना 32 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Maharashtra Rain: २६ जुलैची बदलापूरकरांना पुन्हा भरली धडकी! नदीने गाठली पातळी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

SCROLL FOR NEXT