पिंपरी-चिंचवड

‘सकाळ मैत्रीण’द्वारे नवीन ओळख निर्माण करू

CD

पिंपरी, ता. २५ : ‘सकाळ’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मैत्रीण’ स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला माहितीचे भांडार उपलब्ध झाले आहे. आम्हाला आमची ओळख नव्याने तयार करण्याची संधी मिळत आहे. आम्ही ‘मैत्रीण’ ही आमची ओळख निर्माण करू,’’ असा निर्धार शहरातील महिलांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवडमधील विविध सोसायट्या, संस्था व ‘सकाळ’ यांच्यावतीने संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी महिलांचा संवाद मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सूर्यनगरी सोसायटी, पिंपळे गुरव
सोसायटीत महिलांसाठी नुकताच मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विशेष वक्त्या म्हणून समुपदेशक ॲड. प्रीतिसिंह परदेशी, ‘सकाळ’चे वितरण विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ कुचकर, ‘सूर्यनगरी’चे अध्यक्ष सत्यवान कुंजीर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲड. परदेशी यांनी महिलांना आजच्या डिजिटल युगात वाचनाचे महत्व दिले. तसेच मुली व महिला यांना कायदा, स्वरक्षण याविषयीदेखील माहिती सांगितली. आदिनाथ कुचकर यांनी ‘सकाळ’च्या विविध उपक्रमांची माहिती देत वृत्तपत्र वाचनाचे महत्त्व विषद केले. ‘‘वृत्तपत्रातील माहिती विश्वासार्ह असते. मोबाइलचे दुष्परिणाम पाहता आवश्यकतेपुरता मोबाइल वापरावा. वृत्तपत्राचे वाचन करुन त्यामुळे जे ज्ञान मिळेल त्याचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करावा,’’ असा सल्ला दिला. यावेळी महिलांनी आपल्याकडे असलेल्या विविध कौशल्यांची माहिती दिली.
PNE25V34127


प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, बिजलीनगर
गुरूपौर्णिमेनिमित्त आध्यात्मिक कार्यक्रम भक्तिभावाच्या वातावरणा साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बी.के.करुणा दीदी (भोसरी संचालिका) तसेच सकाळचे वितरण विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ कुचकर, दीपक महाडिक, सचिन माळी उपस्थित होते. यावेळी ‘सकाळ मैत्रीण’ या महिलांसाठी सुरू असलेल्या विशेष पुरवणीची माहिती ‘सकाळ’ टीमकडून देण्यात आली. या सदरामधून स्त्रियांना प्रेरणादायी व उपयुक्त लेख वाचायला मिळतात याचे उपस्थितांनी कौतुक केले. ब्रह्माकुमारी संस्थेच्या आकांक्षादीदी यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या ’मैत्रीण २०२५’या उपक्रमाचे अभिनंदन व कौतुक केले.

श्रीहरी योगा स्टुडिओ, चिंचवड
चिंचवड : ‘‘आम्ही मूळ सकाळ वृत्तपत्राचे वाचक आहोत. सकाळ ‘मैत्रीण’या नावाचे संपूर्ण पान भरून माहितीचे सदर सुरू केले आहे. ते आम्हा महिलांसाठी खूपच महत्त्वाचे आणि कौतुकास्पद आहे. त्यामधील असलेली कला, शिक्षण, पाककृती, सौंदर्य प्रसाधने, प्रवास वर्णन अशा अनेक सदरांमधून महिलांना उपयुक्त अशी माहिती मिळत आहे,’’ अशी प्रतिक्रिया श्रीहरी योगा स्टुडिओच्या संस्थापिका वैशाली देशमाने यांनी दिली. यावेळी योग स्टुडिओच्या शोभा लुकर, योग साधक विनिता रायकर, कल्पना वाले, अहिल्या गावडे आणि श्रीहरी योगा स्टुडिओ केशवनगर चिंचवडचे सर्व योगसाधक उपस्थित होते.
PNE25V34129

रेणुका वृंदावन, वाल्हेकरवाडी
वाल्हेकरवाडी येथील रेणुका वृंदावन सोसायटीत महिलांना ‘सकाळ मैत्रीण’ प्रश्नमंजुषा स्पर्धेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सुरेखा कदम, सुवर्णा कौले, कल्पना रावळ, जयश्री काळे, शारदा चव्हाण, उषा कचारे, ज्योती कानिटकर, सविता सुतार, अपर्णा सरोदे, रसिका मावळे यांच्यासह इतर महिलांची उपस्थिती होती.
PNE25V34132

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

SCROLL FOR NEXT