पिंपरी-चिंचवड

द्रुतगतीवर ई-वाहनांना टोलचा ‘झटका’

CD

अश्‍विनी पवार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी,ता. २५ : प्रदूषण रोखणे आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी ई-वाहनांना पथकर अर्थात टोल माफ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी घेतला. मात्र, द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यांवर अशा वाहनांकडून सर्रास टोलवसुली सुरू आहे. अध्यादेशही झुगारून ही वसुली सुरू असल्याचा आरोप होत आहे. ‘‘आम्ही टोलमाफी मागितली नव्हती. मात्र घेतलेला निर्णयांची राज्य शासनाने योग्य अंमलबजावणी करावी,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया नेहमी पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या इलेक्‍ट्रिक वाहन धारकांनी दिली आहे.
महाराष्‍ट्र शासनाने महाराष्ट्र ‘इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५’ ला एप्रिलमध्ये मान्यता देण्यात आली. या धोरणानुसार राज्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन कर आणि नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्क माफ करण्यात आले. तसेच विविध इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीसाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला गेला. याशिवाय या वाहनांसाठी ठिकठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारणे यासारखे विविध निर्णय घेण्यात आले. या धोरणानुसार मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू या प्रमुख मार्गांवर प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्यात आली आहे. त्याबाबतचा अध्यादेशही मे महिन्यात जारी करण्यात आला आहे. मात्र, टोल कंपन्या याकडे काणाडोळा करत वसुली करत आहेत.

टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांची मुजोरी
सध्या कामानिमित्त दैनंदिनी किंवा आठवड्यातून एकदा पुणे व पिंपरी-चिंचवडमधून मुंबईला प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामध्ये अनेकांकडे इलेक्ट्रिक चारचाकी आहेत. मात्र, आतापर्यंत एकदाही टोलमाफी मिळाली नसल्याचे प्रवाशांनी सांगितले. टोलनाक्यावर अध्यादेशाची प्रत दाखविल्यानंतरही ‘‘आम्हाला अजून वरून आदेश आलेला नाही’’ असे सांगितले जात आहे. अनेकदा यावरून वाहनचालक व टोल ऑपरेटरची वादावादीही होते. मात्र, टोलनाक्यावर कंत्राटदारांचीच मक्तेदारी आहे. त्यामुळे दाद तरी कोणाकडे मागायची, असा प्रश्‍न ईव्ही धारकांनी उपस्थित केला आहे.

मी आठवड्यातून किमान दोन वेळा मुंबईला जातो. मात्र, अद्याप एकदाही टोल माफी मिळालेली नाही. अध्यादेश दाखवलाख तरी टोल नाक्यावरील कर्मचारी दखल घेत नाहीत. त्यामुळे मनस्ताप तर होतोच; मात्र वेळही वाया जातो. समृद्धी महामार्गावरही असाच अनुभव मला आलेला आहे.
- डॉ. प्रतीक भांगरे, पिंपरी चिंचवड

महिनाभरातून दोन ते तीन वेळा मी पुणे-मुंबई असा प्रवास करतो. प्रत्येक वेळी टोल घेतलाच जातो. टोलमाफीची घोषणा होऊन तीन महिने झालेले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य आहे. टोल माफी द्यायचीच नव्हती, तर घोषणाच का केली असा प्रश्‍न ईव्ही धारकांना पडला आहे.
- अनिल तांबे, सेवानिवृत्त कर्मचारी, भुगाव

PNE25V34376

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT