पिंपरी-चिंचवड

संवाद माझा

CD

ओढ्यावर संरक्षक जाळी बसवा
पुणे-आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील संकल्प गार्डन मंगल कार्यालय ते तापकीर चौकापर्यंत चालताना पादचारी ओढ्यात पडण्याचा धोका आहे. हा ओढा उघडा असल्यामुळे रात्रीच्यावेळी वाहनचालकांना तो दिसत नाही आणि अपघाताची शक्यता वाढते. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती पडून गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे या गंभीर समस्येवर तातडीने उपाय योजना म्हणून या ओढ्यावर संरक्षक जाळी बसवणे अत्यंत आवश्यक आहे. संरक्षक जाळी बसवल्याने अपघातांना आळा बसेल. परिसराची स्वच्छता राखण्यास मदत होईल.
- निर्गुण थोरे, चऱ्होली बु
PNE25V34631


एसटीचा थांबा हवा
जय गणेश साम्राज्य चौक (गोडाऊन चौक) ठिकाणी पुण्याहून उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी बसचा थांबा असावा. विरुद्ध बाजूकडून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून तसेच मोशी स्पाईन रस्ता परिसरातील नागरिकांना सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील तसेच लगतच्या कर्नाटक राज्यातील प्रवाशांना जाण्यासाठी थांबा असावा.
- भिकू राऊत, निगडी


पादचाऱ्यांना मार्ग ठेवा
मोशी येथील स्पाईन सिटी मॉल समोर (भोसरी स्पाईन चौक) येथे पदपथ काढून मेकडोनाल्ड चालकाने जनरेटर तसेच कचऱ्याचा डबा ठेवला आहे. या रस्त्यावर चालायला जागा उरलेली नाही. काही दिवसांपूर्वी तेथे एक अपघात झालेला आहे. या गोष्टीची महापालिकेने दाखल घेऊन पादचाऱ्यांना मार्ग ठेवावा.
- दीपक बोरसे, इंद्रायणीनगर, भोसरी
PNE25V34638


खड्डे बुजवून दिलासा द्या
महाराष्ट्रनगरी, गजानननगर, जीवन ज्योती हॉस्पिटल, रहाटणी-काळेवाडी फाटा येथे खड्डे पडून पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. खड्डे बुजवून दिलासा द्यावा.
- अशोक पवार, रहाटणी
NE25V34627


बेवारस रिक्षा हलवा
पिंपळे निलख येथील विशालनगर डीपी रस्त्यावरील डोमिनोज पिझ्झाच्या समोरील पार्किंगच्या जागेत एक बेवारस रिक्षा अनेक महिने पडून आहे. या रिक्षाचे अनेक स्पेअर पार्टस काढून नेण्यात आले आहेत. ही रिक्षा वाहनतळाची जागा विनाकारण अडवत आहे आणि परिसर विद्रूप करत आहे. याबाबतीत ‘सारथी ऍप’द्वारे तक्रार केली असता कोणतीही कारवाई न करता तक्रार निकाली काढण्यात आली.
- हर्षवर्धन शेटे, पिंपळे निलख
PNE25V34628

राडारोडा, पाईप उचला
पवार वस्ती दापोडी, चाचा गिरणीवाले, यांच्या मिळकती समोर गटारीतील पाणी तुंडुब भरल्यानंतर ते वारंवार बाहेर येत असल्याने होणाऱ्या समस्याचे निवारण प्रशासनाने केले. परंतु तेथील राडारोडा व सिमेंट पाईप गेल्या चार दिवसांपासून तसेच आहेत. मुख्य रस्ता असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. लवकरात लवकर राडारोडा उचलण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
- अकील अ. शेख, दापोडी
E25V34629

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT