पिंपरी-चिंचवड

आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन विभाग सज्ज

CD

पिंपरी, ता. २७ ः पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज झाला आहे. प्रत्येक प्रभागनिहाय विशेष पूर नियंत्रण पथके कार्यरत केली असून, या पथकांची जबाबदारी पूरस्थितीत त्वरित मदत पुरवणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आणि परिसरातील बचावकार्य सुकर करणे, अशा स्वरूपाची असणार आहे.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे बचाव कार्यासाठी पुरेशा प्रमाणात उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये १० रबर बोट्स, २०० लाइफ जॅकेट्स, ४४ लाइफ रिंग्स, ५९ रोप्स, १० हुक्स, १३ पोर्टेबल पंप, वॉटर टेंडर, क्विक रिस्पॉन्स व्हेइकल, फायर फायटिंग मोटारसायकल, ४८ कार्यरत अग्निशमन वाहने, वायरलेस सेट्स, वॉकीटॉकी, मेगाफोन व टॉर्चेस यांसारख्या आधुनिक साहित्यांचा समावेश आहे.
नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत संबंधित प्रभागीय कार्यालय अथवा अग्निशमन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये पथके त्वरित घटनास्थळी पोहोचतील. तसेच ज्या भागात पाणी शिरण्याचा धोका आहे, अशा भागांची यादी तयार करण्यात आली असून, त्या भागात पथकांनी गस्त वाढवली आहे. आवश्यकतेनुसार १०० (पोलिस), १०१ (अग्निशमन), १०८ (आपत्कालीन मदत क्रमांक) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

‘‘नागरिकांचा जीव आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. पावसाळ्यात उद्‍भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मदत करण्यासाठी प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या पथकाकडे आवश्यक साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आपत्ती व्यवस्थापन विभागाशी थेट संपर्क साधावा.
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rave Party: आरोपींव्यतिरिक्त अन्य तीन व्यक्ती हॉटेल परिसरात येऊन...; कोर्टात पोलिसांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates: धुळे जिल्हा कानबाई मातेचा महोत्सव - प्रतिष्ठापना अन रात्रभर जागरण

Video: श्रावणात हॉटेल भाग्यश्रीत नॉनव्हेज बंद! २५० रुपयांत स्पेशल व्हेज थाळी लाँच; मारहाणीनंतर मालक पुन्हा सक्रीय, काय आहे मेन्यू?

Mumbai Local Accident: लोकल अपघाताची मालिका सुरुच; रुळ ओलांडताना ९२२ प्रवाशांचा मृत्यू

Mangal Budh Yuti 2025 : मंगळ बुधाच्या युतीमुळे या 5 राशींचे वाजणार तीन तेरा ! संकटांची रांग आणि आरोग्याच्या अडचणी

SCROLL FOR NEXT