पिंपरी-चिंचवड

सावधान ! उपवासाच्या भगरीमध्ये ‘साव्या’ची भेसळ

CD

अनंत काकडे ः सकाळ वृत्तसेवा

चिखली, ता. २७ : उपवास धरताय, सावधान... कारण, तुमच्या उपवासाच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. त्यामुळे तुम्ही श्रद्धेने करत असलेला उपवास हा मोडला जाऊ शकतो. कारण, उपवासाची भगर आणि आणि साबुदाण्याच्या पिठामध्ये भगरी सारखेच ‘सावा’ नावाचे धान्य आता मोठ्या प्रमाणात मिसळला जात आहे.
श्रावण महिन्यापासून सणासुदीचे आणि उपवासाचे दिवस सुरू होतात. हे उपवास नवरात्रापर्यंत सुरू राहतात. फळे, सुकामेवा परवडत नसल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला व नागरिक उपवासासाठी साबुदाणा, भगर यासारख्या पदार्थांचा वापर करतात. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये साबुदाणा आणि भगर या पदार्थांचा उपवासासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, मसाल्याच्या पदार्थांमध्ये जसे जिऱ्यामध्ये सुवा, मिरीमध्ये पपईच्या बिया, किंवा त्या सारख्या दिसणाऱ्या बिया मिसळून भेसळ केली जाते. त्याचप्रमाणे आता भगरमध्येही भगरसारखा दिसणारा ‘सावा’ नावाचे धान्य मिसळले जात आहे.

खाण्यासाठी नव्हे भेसळीसाठी !
राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या भागांत त्याचे उत्पादन होते. मात्र, तो सावा वरील भागात खाण्यासाठी वापरला जात नाही. मात्र, तो भगरी सारखाच दिसत असल्याने भगरीत मिसळून मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. भगरीपेक्षा तो अतिशय कमी दरात मिळतो. भगरीचा दर शंभर रुपये किलो असल्यास सावा ७० रुपये किलो दराने बाजारात मिळतो. परिणामी, अधिक नफा कमविण्याच्या अपेक्षेने काही दुकानदार भगर म्हणून सावाची विक्री करतात. मात्र, हा सावा उपवासाला चालत नाही. त्यामुळे आपण श्रद्धेने धरत असलेला उपवास मोडला तरी भेसळ करणाऱ्यांना त्याचे काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सावा कसा ओळखावा ?
- घरची गावरान भगर असल्यास सावा मिसळता येत नाही
- गावरान भगर ही बाजरी प्रमाणे थोडीशी काळपट असते
- सावा हा पूर्णपणे पांढरा दिसतो
- दुकानातील पांढऱ्या शुभ्र भगरीमध्ये सावा सहजपणे मिसळता येतो
- पांढऱ्या भगर सारखाच दिसतो. मात्र, भगरीमध्ये तो ओळखता येतो
- भगरीपेक्षा जाडसर आणि मोठा असतो, खाण्यास तो बेचव असतो

भगरीमध्ये सावा मिसळला जातो. ही बाब खरी आहे. मात्र, भगर किंवा त्याचे तयार पीठ घेतल्यानंतर दुकानदारांनाही भेसळ झाल्याचे सहजासहजी ओळखता येत नाही. त्यामुळे जे व्यापारी भेसळ करतात. तेथेच त्यांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे.
- रोहिणी पवार, व्यापारी, चिखली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याचा मुलाला ड्रग्जसह अटक! युवतीसोबत पळून जाताना थांबवले तर पोलिसांच्या अंगावर घातली गाडी

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान

Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...

AI क्रांतीचा फटका! कामगिरी नव्हे, कौशल्य हवे! TCS ने बदलली खेळी, 12 हजार कर्मचाऱ्यांची करणार कपात

SCROLL FOR NEXT