पिंपरी-चिंचवड

इस्कॉन मंदिर परिसरात विनामूल्य वाहनतळ

CD

पिंपरी, ता. २९ ः रावेत येथील इस्कॉन मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी रावेत प्राधिकरण पेठ क्रमांक २९ मध्ये विनामूल्य वाहनतळ उभारण्यात येणार आहे. आनंद विहार रेणुका वृदांवन इमारतीशेजारील खुली जागा क्रमांक सहामधील टॉवर लाईनखालील क्षेत्राखाली वाहनतळ असेल. ११ महिने कालावधीसाठी ते देण्यात येणार आहे. त्यासह विविध विकास कामांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.
स्थायी समिती बैठकीत बोपखेल स्मशानभूमी वीज मीटरसाठी रक्कम देणे, निगडी प्राधिकरणात स्थापत्य विषयक दुरुस्ती कामे करणे, प्रभाग १० व १४ मधील पाणीपुरवठा दुरुस्ती व नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, सांगवी रुग्णालयाची जुनी इमारत पडून नवीन बांधण्यासाठी वास्तुविशारद नेमणे, अग्निशमन विभागासाठी ऑन बोट मोटार दुरुस्ती करणे, औद्योगिक इमारत, कारखाने, व्यवसाय अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्र देणे, निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील स्वच्छतागृहांची निर्मिती करणे, बायोमेट्रिक फेस रीडिंग व फिंगर प्रिंटमशीन देखभाल व दुरुस्ती कामास मुदतवाढ देणे, दिव्यांग व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी एजन्सी नेमणूक करणे, ई क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये अतिरिक्त वीजभार घेण्यासाठी महावितरणला रक्कम देणे, रुग्णालयीन कामकाजासाठी वैद्यकीय अधिकारी व मनुष्यबळ पुरवठा करणे, स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत विविध कामे करणे व ई वेस्ट प्रकल्पांची शॉर्ट व्हिडिओ फिल्म बनविणे, मुख्य इमारतीच्या आवारातील उपहारगृहची जागा भाडे तत्त्वावर देणे, संजय काळे सार्वजनिक शौचालयांची देखभाल दुरुस्त, वृक्षारोपणासाठी रोपे तयार करणे, शहरातील विविध रस्ते, उद्याने, मोकळ्या जागा, चौकांत लागवडीसाठी हंगामी रोपे पुरविणे, मोशीत ३० मीटर रुंद डीपी रस्त्यांचे काम करणे आदी विषयांनाही सिंह यांनी मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT