पिंपरी-चिंचवड

ऐन श्रावण महिन्यात फळे महागली

CD

पिंपरी, ता. ३ ः सण-उत्सवांचा श्रावण महिना सुरू झाल्याने बाजारात फळांना मागणी वाढत आहे, मात्र उपवासासाठी लागणाऱ्या फळांचे भाव १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
वाहतूक खर्च तसेच वाढती वाढल्याने फळे १० ते १५ टक्क्यांनी महागल्याचे शहरातील फळविक्रेत्यांनी सांगितले. खरबूज, पपई व लिंबाचेही भाव मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने वाढले आहेत.
श्रावण महिन्यात सोमवार, गुरुवार व शनिवार या दिवशी अनेक जण उपवास करतात. त्यामुळे या महिन्यात फळांची मागणी वाढते. विशेषतः, केळी, डाळिंब, खरबूज, सफरचंद आणि पपई अशा फळांचे भाव वाढले आहेत.
काश्मीरची सफरचंदे मुंबईमार्गे येतात. सध्या ती काहीशी आंबट असल्याने खरेदी जास्त होत नाही. याशिवाय पेरू, मोसंबी, हिरवी द्राक्षे, संत्री, चिकू या फळांचा हंगाम नसल्याने त्याची आवक राज्यातून होत नाही. पेरूचा हंगाम नसल्याने ते परराज्यांतून येत आहेत.
शहरातील बाजारपेठांत केळ्यांची आवक होत असते. सध्या केळ्यांचेही भाव जास्त आहेत.
---
फळांचे भाव
केळी ः ६० रुपये डझन
वेलची केळी ः ८० रुपये डझन
डाळिंब ः १५०-२०० रुपये प्रतिकिलो
सफरचंद ः २०० रुपये प्रतिकिलो
पपई ः ८० रुपये प्रतिकिलो
पेरू ः १६० रुपये प्रतिकिलो
द्राक्षे ः २०० रुपये प्रतिकिलो
चिकू ः १८० रुपये प्रतिकिलो
----
श्रावण महिन्याच्या सुरवातीला फळांना मागणी वाढते. त्यामुळे काही फळांचे भाव वाढले आहेत. आवक कमी असल्याने फळे १० ते १५ टक्क्यांनी महागली आहेत. येत्या काही दिवसांत पुन्हा भाव वाढण्याची शक्यता आहे.
- शंकर पवार, फळविक्रेता, पिंपरी
---
फोटो
35345
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, २२ महिन्यांनी जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात, टोमॅटो फेकून रस्त्यावर लाल चिखल

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SCROLL FOR NEXT