पिंपरी-चिंचवड

‘माहेरवाशीण’ मेळाव्यात नववधुंना आरोग्य मार्गदर्शन

CD

सोमाटणे, ता. ४ : ग्राम प्रबोधिनी विद्यालय, साळुंब्रे यांच्या वतीने सुरू करण्यात आलेला ‘माहेरवाशीण’ मेळावा साळुंब्रे येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यास कासारसाई, शिरगाव, दारुंब्रे, गोडुंब्रे, सोमाटणे येथील ७५ नववधुंसह अन्य सहा गावांतील महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

मेळाव्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. डॉ. वर्षा वाढोकर व डॉ. शिल्पा सोमकुंवर यांनी आरोग्याविषयी, तर शिक्षिका संघाच्या जिल्हाध्यक्षा नेहल बाळसराफ यांनी नारीशक्तीविषयी मार्गदर्शन केले. सरपंच नंदा आगळे, निशा सावंत, पल्लवी गोपाळे आदींसह इतर महिला उपस्थित होत्या.

नववधुंचे प्रबोधन, सक्षमीकरण व सन्मान, सासरच्या अडचणी, योग्य आहार, चांगले आरोग्य, आनंदी जीवन कसे जगावे आदींविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने विद्यालयाचे प्राचार्य व्यंकटराव भताने यांच्या पुढाकारातून तीन दशकांपूर्वी या उपक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाची सांगता पवना हॉस्पिटलच्यावतीने महिलांची आरोग्य तपासणी व ओटी भरून करण्यात आली. मेळाव्याचे नियोजन भताने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शिक्षकांनी केले.

साळुंब्रे : ‘माहेरवाशीण’ मेळाव्यात सहभागी झालेल्या महिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं पुन्हा महागणार? 'हे' ठरणार कारण...रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा! आजचा भाव काय?

Yogi Adityanath: लखीमपूर खेरीत पूरग्रस्तांना ५ हजार ‘सीएसआर स्पेशल किट’चे वाटप; योगी सरकारचा पुढाकार

Teenagers Obsessed Crime : मिसरूड न फुटलेल्या पोरांना घोडागाडी शर्यतीचा नाद, दुचाकी चोरीने करिअरची बरबादी; पालकांना पुसटशीही कल्पना नाही...

Latest Marathi News Live Update : त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण, तीन ते चारजण गंभीर जखमी

Google Chrome बनले सुपरब्राउजर; 10 AI फीचर्सची धमाकेदार एन्ट्री, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT