पिंपरी-चिंचवड

सांगवडे पुलावरील वाहतूक बंद

CD

सोमाटणे, ता. ३ : पवना नदीवरील सांगवडे पुलावरील वाहतूक नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनचालकांनी सांगवडे पुलावरून अडथळा तोडून वाहतूक सुरू केली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागाने कार्यवाही केली आहे.
सांगवडे पूल हा केवळ पादचारी आणि दुचाकी वाहनांसाठी बांधण्यात आला होता. मात्र, काही काळापूर्वी चारचाकी वाहने पुलावरून चालू झाल्याने पुलाचे स्तंभ, स्लॅब आणि अँगल तुटले. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी पुलाच्या प्रवेशद्वारावर अडथळा बांधून चारचाकी वाहनांसाठी पूल बंद केला होता. पूल धोकादायक असल्याची सूचना फलकांद्वारेही लावण्यात आली होती. तरीही काही वाहनचालकांनी हा अडथळा तोडून वाहतूक पुन्हा सुरू केली होती. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच संबंधित विभागाने कुंडमळ्याच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, जेसीबीच्या साहाय्याने पुलाच्या प्रवेशद्वारावर अवजड दगड टाकून पूर्ण वाहतूक बंद केली आहे. दरम्यान, नवीन पुलाचे काम वेगाने सुरू असून, काम पूर्ण होईपर्यंत जुना लोखंडी पूल वाहतुकीसाठी कायमचा बंद राहणार आहे.

PNE25V36868
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army and USA: भारतीय सैन्याने ५४ वर्षांपूर्वीचा 'तो' पुरावा उघड करत, ट्रम्प यांना थेट आरसाच दाखवला!

Vitamin D Deficiency : व्हिटॅमिन D ची कमतरता का भासते? जाणून घ्या माहिती सविस्तरमध्ये

Latest Maharashtra News Updates Live : जिल्हा परिषदेच्या चार हजार ८० जागांच्या भरतीचा मार्ग मोकळा

'ती त्याच्यासमोर पुर्णपणे विवस्त्र होती' राखी सावंतचा तनुश्री दत्तला टोमणा, म्हणाली...'हिला फक्त नाना पाटेकर...'

Video : जन्मदाती रस्त्यावर मग वंशाचा दिवा कशाला हवा? रेल्वे स्टेशनवर भीक मागणारी वृद्ध आई, काळीज पिळवटणारा व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT