पिंपरी-चिंचवड

सोसायटी कामकाजाबाबत स्तुत्य उपक्रम

CD

पिंपरी, ता. ४ ः फेडरेशन ऑफ घरकुल, पुणे जिल्हा उपनिबंधक कार्यालय व महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे यांच्या वतीने चिखली घरकुल येथे सोसायटी कामकाजाबाबत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. याचे उद्‍घाटन उपनिबंधक मुकुंद पवार यांनी केले. यावेळी फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष अशोक मगर, संचालक सुजाता विधाते, निर्जला चौधरी, सुदामा जाधव, विनायकराव लाटे, युवराज निलवर्ण, संतोष दिवटे उपस्थित होते.
आर्थिक दुर्बल घटकांसाठी चिखली घरकुल येथे सदनिका बांधण्यात आल्या आहेत. या ठिकाणी जवळपास १५८ सोसायटी असून, २० हजारांहून अधिक रहिवासी राहतात. सोसायटीच्या संचालक मंडळांच्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी फेडरेशन ऑफ घरकुल यांनी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यात सोसायटीतील अध्यक्ष, सचिव, खजिनदार यांचे कामकाज काय असते तसेच सोसायटी ऑडिट संदर्भामध्ये व सोसायटी थकीत असल्यानंतर कोणती कारवाई केली जाते? याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी पवार म्हणाले, ‘‘सोसायटी कामकाजाबाबत भरपूर तक्रारी येतात. त्यामुळे खूप सभासदांना प्रशिक्षणाचा अभाव असतो. प्रत्येक सोसायटींना असा कार्यक्रम सोसायटीमध्येसुद्धा राबवला पाहिजे व नागरिकांना प्रशिक्षण दिले तरच सोसायटीतील वादविवाद व कामकाजाचे प्रश्न सुटतील.’’ ॲड. अजित बोराडे यांनी थकीत सोसायटीबाबत कोणती कारवाई केली जाते याची माहिती दिली. लक्ष्मण इंदोरे यांनी सोसायटी ऑडिटबाबत माहिती दिली. प्रस्तावना दशरथ शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब गवळी यांनी केले. शिवाजी भुजबळ यांनी आभार मानले.

‘‘वेगवेगळ्या भागांतून आलेल्या नागरिकांनी एकत्र येऊन घरकुलमध्ये सोसायटी तयार केल्या. परंतु, प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे कामकाजामध्ये अडचण येत होत्या. त्यामुळे प्रशिक्षण शिबिर घेण्याचा निर्णय संचालक मंडळात घेतला.
- अशोक मगर, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ घरकुल
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs OMN Live: भारताची विजयी हॅटट्रिक! Super 4 मध्ये रविवारी IND vs PAK सामन्याची मेजवानी; जाणून घ्या पुढील सामन्यांचे वेळापत्रक

IND vs OMN Live: हार्दिक पांड्याची मॅच विनिंग कॅच! अर्शदीप सिंगने रचला इतिहास, ओमानच्या कलीमने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

Sam Pitroda clarification : ''पाकिस्तानमध्ये मला घरासारखं वाटलं'' म्हणणाऱ्या सॅम पित्रोदांनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

Woman Cries for Panipuri VIDEO : पाणीपुरीसाठी कायपण…! महिलेन थेट रस्त्यातच ठाण मांडत सुरू केलं मोठ्यानं रडण अन् मग...

IND vs OMN Live: ८ विकेट पडूनही सूर्यकुमार यादव फलंदाजीला का आला नाही? समोर आलं कारण...

SCROLL FOR NEXT