पिंपरी-चिंचवड

शालेय जगत शालेय जगत

CD

शालेय जगत

शिवाजी राजे विद्यालयाचा
रोबोटिक मॉडेल स्पर्धेत ठसा
इंडियास टेन फाउंडेशनतर्फे मुंबईत आयोजित रोबोटिक मॉडेल स्पर्धेत चिंचवडच्या श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ठसा उमटविला. पूर्व तामस्कर, श्रवण आल्हाट, हर्षवर्धन पुजारीया या विद्यार्थ्यांनी मिथेन वायू गळती लवकर लक्षात येण्यास रोबो कशी मदत करू शकतो या विषयावर सादरीकरण केले. त्यांना सिद्धी कारंजकर, प्रतिभा साबळे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत राज्यातील सुमारे २५ ते ३० रोबोटिक लॅबच्या स्पर्धकांनी भाग घेतला. या कामगिरीबद्दल विद्यालयातर्फे संस्थेचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, उपमुख्याध्यापिका सुषमा संधान, छाया ओव्हाळ मनीषा जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
---
स्काऊटर, गाईडर उजळणी वर्ग
चिंचवडगाव येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पुणे भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय तसेच जिल्हा परिषदेचा प्राथमिक-माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात सोळावा एक दिवसीय युनिट नोंदणी व स्काऊटर- गाईडर उजळणी वर्ग घेण्यात आला. पुणे जिल्हा भारत स्काऊट गाईडचे सहाय्यक जिल्हा आयुक्त अॅड. राजेंद्र मुथा व सहाय्यक सचिव प्रा. अनिल कांकरिया यांच्याहस्ते स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्या सुनीता नवले, जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे, जिल्हा आयुक्त स्काऊट (प्रौढ संसाधन) राफेल जॉन स्वामी, जिल्हा संघटक गाईड उषा हिवराळे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड शमा शिकलगार, प्रशिक्षण समुपदेशक मिलिंद संधान, सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट विजयकुमार जौरी, अनघा दिवेकर, स्काऊट समन्वयक अनघा दिवेकर, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन व पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया, पर्यवेक्षक संजीव वाखारे, पर्यवेक्षिका मनिषा कलशेट्टी यावेळी उपस्थित होते.
---
ड्रोनविषयी कार्यशाळा
श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थतर्फे विद्यार्थ्यांसाठी ड्रोन विषयी कार्यशाळा झाली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मोहन पुजारी, प्रकल्प सहाय्यक अधिकारी सारंग बालंखे तसेच दीप्ती पुजारी (प्रकल्प नियंत्रक) यांनी ड्रोनची निर्मिती, शेती व्यवसायातील वापर, बचाव कार्यातील वाढता वापर याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य राजकुमार गायकवाड यावेळी उपस्थित होते. ड्रोनचे प्रात्यक्षिक पाहताना विद्यार्थ्यांना अत्यानंद झाला होता. संस्थेच्या संचालिका प्रा. अलका पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुजरे यांच्या संकल्पनेतून कार्यशाळा झाली.
---
वक्तृत्व स्पर्धा
चिंचवडमधील श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा झाली. उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेत विविध विषयांचा समावेश होता. ओम अभिजित परदेशी (इयत्ता ५ वी) याने लोकमान्य टिळकांचे चरित्र अभिनयाद्वारे मांडले. मयूर कांबळेने (९ वी) अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची थोरवी सांगितली. दुर्वेश सोनवणेने (१० वी) व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी प्रभावी मांडणी केली. परीक्षक म्हणून इयत्ता पाचवी ते सातवीच्या विभागाचे ज्येष्ठ शिक्षक गोरक्षनाथ आगळे व प्रभातकुमार जैन, तर आठवी ते दहावीच्या विभागासाठी ज्योती राऊत व मेघा नलावडे यांनी काम पाहिले. प्रेरणा आरोटे यांनी सूत्रसंचालन केले.
----
ताराबाई शंकरलाल मुथा
सौ ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात मेंदी स्पर्धेत मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्राचार्या भारती सारंगा यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे आयोजन सारिका प्रांजळे आणि अपर्णा कुदळे यांनी केले. रमेश कुत्तरवडे यांनी परिक्षण केले.
---
प्राथमिक विद्यालय, जाधववाडी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या साई जीवन विद्यालय मुले
क्रमांक ८७ शाळेत शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक झाली. यात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. यासाठी डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यात आले. मुख्याध्यापिका जयश्री गळीतकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या उपक्रमामुळे प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना नागरिकशास्त्र विषयाची ओळख झाली. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव घेतला. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यांची निवड योग्य प्रकारे झाली. आठवीतील विद्यार्थ्यांनी मतदार यादीतील नाव वाचणे, रजिस्टरवर सही घेणे, बोटावर शाई लावणे अशी कामे केले. ज्येष्ठ शिक्षक संतोष भोते यांनी विजयी उमेदवारांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले. या उपक्रमासाठी बाबासाहेब आव्हाड, धर्मेंद्र भांगे यांनी विशेष सहकार्य केले. रेखा जाधव यांनी फलक लेखन केले. कविता धायरकर, राणी कांबळे, अमोल फुंदे यांचा संयोजनात सहभाग होता. मतमोजणी अधिकारी म्हणून सर्व शिक्षकांनी काम केले.

मेंदी स्पर्धा
वडमुखवाडीतील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात मेंदी स्पर्धेत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या. प्राथमिक विभागात सायली पारधी प्रथम क्रमांक, धनश्री भालेरावने द्वितीय, तर सई गरडने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक विभागात आकांक्षा बेदरेने प्रथम, ईशा पांचाळने द्वितीय, तर आरती म्हस्केने तृतीय क्रमांक पटकावला. उच्च माध्यमिक विभागात प्राची मांडवेने प्रथम, रोहिणी चौरे व वैष्णवी हंकारे या दोघींनी अनुक्रमे द्वितीय, तर गायत्री दोडेने तृतीय क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेत प्राथमिक विभागात आयुष्य रांगणेकरने प्रथम, मयांक मुंढेने द्वितीय, तर पृथ्वीराज सौनेने तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख ज्योती भोई, सहशिक्षिका राणी पालेकर, किरण ठाकूर, दाक्षायणी कुलकर्णी, तृप्ती सांगळे, सोनाली देवकर, अर्चना पाटील यांनी मार्गदर्शन केले.
---
गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण
श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेतर्फे आयोजित हिंदी राष्ट्रभाषा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्राचार्य राजकुमार गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. विद्यालयातील विभागप्रमुख नितीन वारखडे, विभाग प्रमुख नीलम नाईक यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. इयत्ता सहावीतील चिन्मय पिंगुळकर, प्रांजली बांगर, मृण्मयी कुलकर्णी यांनी प्रथम, शर्मिष्ठा पाटीलने द्वितीय, चैताली कवडाले व श्रेया यमलवार यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता सातवीतील समर्थ खरातने प्रथम, समर्थ मोरेने द्वितीय, तर विराज फफाळ व पूर्वा गुरव यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक पटकावला. इयत्ता आठवीतील ज्ञानेश्वरी थोरवेने प्रथम, ईशा पांचाळने द्वितीय, तर अनुष्का दैने हिने तृतीय क्रमांक पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India responds strongly to Trump: ट्रम्प यांचे आरोप अन् टॅरिफ वाढवण्याच्या धमकीला आता भारताचंही सडेतोड प्रत्युत्तर, म्हटले...

Video Viral : गुजरातमध्ये हत्तीवर अन्याय! व्हिडीओ व्हायरल; 'महादेवी'प्रमाणे पेटा लक्ष घालणार का?

Local Block: मोठी बातमी! ५ ते ८ ऑगस्टपर्यंत लोकलचा विशेष ब्लॉक, सेवा पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या वेळापत्रक

Truck Accident : गोंडपिपरीत विचित्र अपघात! ट्रॅकने एक किलोमीटर नेले फरफटत; एकाचा मृत्यू, तीन गंभीर

Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

SCROLL FOR NEXT