सोमाटणे, ता. ११ : श्री घोरावडेश्वर पायथा येथे घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने बसथांबा शेड उभारण्यात आला आहे. त्यामुळे भाविक आणि परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
पीएमपी बसने येणारे भाविक श्री घोरावडेश्वर पायथा येथे उतरून डोंगरावर दर्शनासाठी जातात. शिवाय, यात पर्यटकांची संख्याही मोठी आहे. प्रामुख्याने एकादशी, महाशिवरात्र आणि सार्वजनिक सुटीदिवशी सहकुटूंब येणाऱ्यांची संख्या येथे मोठी असते. या नागरिकांना परत जाताना डोंगराच्या पायथ्याशी बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागते. या परिसरात एकही मोठे झाड नसल्याने प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठाच्या वतीने अध्यक्ष रघुवीर शेलार, किसन भेगडे, सतीश आगरवाल आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून मदत केली. त्यांच्या प्रयत्नांतून नुकतेच बसथांबा निवारा शेड उभारण्यात आले आहे. त्यामुळे ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांना संरक्षण मिळणार आहे.
PNE25V05420
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.