पिंपरी, ता. ११ ः पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्यावतीने देण्यात येणारा अहिंसा पुरस्कार स्वामी गोविंददेव गिरी, डॉ. श्रीपाल सबनीस आणि रघुनाथ ढोले यांना प्रदान करण्यात आला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया, किरण शहा, विजय भिलवडे, नेनसुख मांडोत, दिलीप भन्साळी, संदीप फुलफगर, श्रेणिक मंडलेचा, शांतिनाथ पाटील, संदेश गदिया, विरेश छाजेड, मोहनलाल संचेती, अजित पाटील, नितीन बेदमुथा, प्रा. प्रकाश कटारिया आदी उपस्थित होते.
‘भगवान महावीरांचा अनेकांतवाद हे सर्व संघर्षांना टाळण्यासाठी समर्थक उत्तर आहे.’ असे प्रतिपादन गोविंद देव गिरी यांनी केले. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ‘आजच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण विश्वाला वाचवायचे असेल, तर भगवान महावीरांची अहिंसाच युद्धाला टाळू शकेल.’ तर पर्यावरण प्रेमी रघुनाथ ढोले यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले. भक्ती गीत स्पर्धेमध्ये विजयी ठरलेले जैन संस्कार, चिंचवडगाव (प्रथम क्रमांक), अहिंसा ट्रस्ट, निगडी (व्दितीय क्रमांक ) सुरसंगम, पुणे (तृतीय क्रमांक) या भक्तिमंडळांना बक्षिसाची रक्कम व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. जैन महासंघाच्यावतीने आयोजित अहिंसा सप्ताहासाठी योगदान देणाऱ्या किरण शहा, विदेश देसरडा, देवेंद्र लुंकड, तेजस्विनी कांकरिया, धर्मेश गांधी, सौरभ बेदमुथा यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. अहिंसा पुरस्कार समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. अशोककुमार पगारिया यांनी केले. भक्तिगीत स्पर्धा पुरस्कार समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश कटारिया यांनी केले. दिलीप भन्साळी यांनी आभार मानले. मोहित बारोट यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. प्रा. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तसेच, भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.