पिंपरी-चिंचवड

पिंपरी बाबासाहेब आंबेडकर पुरवणी विशेष

CD

प्रेरणादायी स्फूर्तिस्थान...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी

पीतांबर लोहार : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १३ : पुणे-मुंबई महामार्ग आणि पिंपरीगाव ते भोसरी या रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या पिंपरी चौकालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेने उभारला आहे. चौकाचे नामकरणच ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे आहे. पुतळ्याच्या परिसराला बागेचे स्वरूप दिले आहे. येथील कारंजे अन् रोषणाई सर्वांना आकर्षित करते. संरक्षक भिंतीलगतच्या म्युरल्सद्वारे बाबासाहेबांचा जीवनप्रवास साकारला आहे. संविधानाची उद्देशिका एका शिळेवर असून बोधीवृक्षाची सावली सदैव मिळत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक सर्वांसाठी प्रेरणास्थान, स्फूर्तिस्थान आहे.
शहरातील कोणत्याही विषयावरील आंदोलन असो निदर्शने, सभा असोत वा संमेलने, मोर्चा असो वा जनजागृती फेरी, ईदचा जुलूस असो वा साहित्य संमेलनांची ग्रंथदिंडी, अन्यायाविरुद्ध लढा उभारणे असो वा ज्ञानक्रांतीची मशाल पेटवणे या सर्वांचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक होऊनच केला जातो. बाबासाहेबांचे हे स्मारक सर्वांचे स्फूर्तिस्थान ठरले आहे. शहरासह लगतच्या भागातून आलेला प्रत्येक व्यक्ती येथून प्रेरणा घेऊन जातो.

महापालिका होण्यापूर्वी...
महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड नगरपालिका होती. तेव्हाच्या परिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पिंपरी चौकात पुतळा उभारण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला. त्यानुसार अर्धपुतळ्याची उभारणी व अनावरण १४ एप्रिल १९८१ मध्ये करण्यात आले. त्यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष मामासाहेब पिंपळे होते. तर, नगराध्यक्ष चिंचवड येथील डॉ. श्री. श्री. घारे होते. १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली.

महापालिका झाल्यानंतर...
महापालिका अस्तित्वात आल्यानंतर अर्थात १९८२ नंतर अर्धपुतळ्याऐवजी पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार महापालिकेने पूर्णाकृती उभारण्याचा निर्णय घेतला आणि २५ फेब्रुवारी १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. त्यावेळी पी. व्ही. मसुरे हे पुतळा समितीचे अध्यक्ष होते.

पुतळा स्थलांतर, सुशोभीकरण
मुंबई-पुणे महामार्गाचे रुंदीकरण झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे स्थलांतर व परिसर सुशोभीकरणाचा निर्णय सन २००० मध्ये घेण्यात आला. त्यानुसार कार्यवाही झाली आणि १२ एप्रिल २००२ रोजी सध्याचा पूर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभीकरणाचे अनावरण सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. नंतर म्युरल्सद्वारे बाबासाहेबांचा जीवनपट साकारण्यात आला.

दृष्टिक्षेपात...
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा
- स्मारकातील पुतळ्यावर बुद्ध विहारासारखा घुमट
- पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी बुद्ध लेणीप्रमाणे खिडक्‍या
- पुतळ्यासमोर दोन्ही बाजूंस सुंदर कारंजे, रोषणाई
- स्मारक परिसरात शोभेची व फुलझाडांची लागवड
- परिसरात हिरवळ, बोधिवृक्ष, संविधान उद्देशिका
- डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट म्युरल्सद्वारे उलगडणारी भीमसृष्टी
---
PNE25V06015

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

Badlapur Crime: तस्करीचे धागे नाशिकपर्यंत! स्त्रीबीजप्रकरणी अटक डॉक्टरला पोलिस कोठडी

Gajanan Maharaj elephants Video: शेगावातील श्री गजानन महाराजांचे हत्ती आठवतात का? रामकली-चंपाकलीचा 2007 चा व्हिडिओ व्हायरल

Lucky Mulank : 'या' मूलांकाच्या मुली लग्नानंतर नवऱ्यासाठी ठरतात लकी; घरी होतो मोठा धनलाभ, लक्ष्मीच्या पावलाने बदलतात सासरच्यांचे नशीब

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

SCROLL FOR NEXT