पिंपरी-चिंचवड

राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प स्पर्धा

CD

- विद्याश्री कोकणे (राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील कम्प्युटर सायन्स आणि बिझनेस सिस्टीम विभागातर्फे राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांमध्ये वास्तविक जगातील समस्यांसाठी नावीन्यपूर्ण निराकरण विकसित करण्यासाठी प्रोत्साहन, तांत्रिक कौशल्ये आत्मसात व्हावी हा स्पर्धेचा उद्देश होता. यामध्ये विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नवनवीन तंत्रज्ञानातील प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मशीन लर्निंग, वेब-थ्री, सायबर सेक्युरिटी क्षेत्रातील सॉफ्टवेअर, हार्डवेअर प्रकल्प सादर केले. नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतील परीक्षकांनी मूल्यांकन केले. प्रा. कविता पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वैष्णवी भोंग, सुहासिनी भट, डॉ. कीर्ती देशपांडे, डॉ. नीरज साठवणे यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुधीर भिलारे, प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांचे सहकार्य लाभले. विभागप्रमुख डॉ. कविता मोहोळकर यांनी मार्गदर्शन केले.

महात्मा फुले यांना अभिवादन
- गणेश सुरवसे (मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज)
मॉडर्न कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज, यमुनानगरमध्ये महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. प्राचार्य सदाशिव शिरगावे आणि शैक्षणिक समन्वयक डॉ. प्रसन्ना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या जीवनकार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सामाजिक न्याय आणि समतोल राखण्यासाठी महात्मा फुले यांच्या आदर्शांचा स्वीकार करण्याचे आवाहन प्राचार्यांनी केले.

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची निवड
(मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निक, काळेवाडी)
मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निकमध्ये ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल शाखेच्या डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन केले होते. एलिक्सिर-इंडिया आणि वन के टु के डोसिंग अँड डिस्पेंसिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित उपक्रमात ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमधील २० आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील २७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुलाखत पॅनलचे नेतृत्व एचआर व्यवस्थापक सुश्री देविना यादव आणि विक्री व्यवस्थापक सूरज पाटील यांनी केले. कंपनीचे भागीदार प्रवीण खरगवंशी यांनी कंपनीच्या दृष्टी, ध्येय, कार्य संस्कृती, प्रशिक्षण कार्यक्रम आणि करिअर वाढीच्या संधींबद्दल माहिती दिली. निवडलेल्या पाच विद्यार्थ्यांना तीन लाख १३ हजार ७०७ रुपये नोकरीचे पॅकेज मिळाल्याचे नियुक्ती अधिकारी गणेश म्हाळंकर यांनी सांगितले. प्राचार्या गीता जोशी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

‘एमबीए आर्को क्लब’ सहल
- नेहा वडगावे (आयआयसीएमआर)
आयआयसीएमआरच्या आर्को क्लबतर्फे गोवा येथे शैक्षणिक सहल आयोजित केली होती. त्यात ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इतिहास, संस्कृती व व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण धडे गिरवले. प्राध्यापक समन्वयक पूजा गवांदे आणि हर्षल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समन्वयक नेहल मोरे आणि गौरव भोईर यांनी सहलीचे उत्कृष्ट नियोजन केले. वेळेचे व्यवस्थापन, टीमवर्क, नेतृत्व आणि आर्थिक नियोजन यांसारख्या व्यावहारिक कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळाली. गोव्याच्या ऐतिहासिक किल्ल्यांपासून ते निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांपर्यंतच्या ठिकाणी भेटी देताना त्यांनी निर्णयक्षमतेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांना केवळ पर्यटनाचा आनंदच नाही तर व्यवस्थापनाच्या मूलभूत संकल्पनांची प्रत्यक्ष अनुभूतीदेखील मिळाली. स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन उद्योग, वासाहतिक इतिहास आणि संस्कृती यांचा सखोल अभ्यास करून त्यांनी अकादमिक ज्ञानाला व्यावहारिक दृष्टिकोन जोडला. संचालक डॉ. अभय कुलकर्णी आणि एमबीए विभागप्रमुख डॉ. मनीषा कुलकर्णी यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT