पिंपरी-चिंचवड

क्यूआर कोडचा वापर करून आंब्याची विक्री देवगड हापूस ओळखण्यासाठी शेतकऱ्याने लढविली शक्कल

CD

पिंपरी, ता. १३ : हापूस आंब्याचे नाव घेतले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आमरस- पुरीचा बेत तर अनेकजण करतात. मात्र, काही विक्रेते ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेत हापूसच्या नावाखाली भलताच आंबा विकतात. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. यावर शेतकऱ्यांनीच आता अजब शक्कल लढवली असून, प्रत्येक हापूस आंब्यावर क्यूआर कोडचा वापर करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक टळणार आहे.
वर्षभरात एकदा मिळणारा हापूस आंबा महाग असला तरी त्याची हमखास खरेदी केली जाते. अशावेळी परराज्यातील आंब्याची हापूस म्हणून विक्री केली जाते. यासाठी देवगड हापूस आंब्याच्या नावाने बाजारात होणारी तोतयागिरी आणि बनावट आंब्यांची विक्री रोखण्यासाठी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने या वर्षीपासून प्रत्येक देवगड हापूस आंब्यावर टँपर प्रूफ युआयडी सील सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खरेदीदारांची मोठी फसवणूक टळणार आहे. हापूस आंब्याचा क्यूआर कोड कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या फळांसाठी राखीव असणार आहे.

पुण्यात आंबा महोत्सव सुरू
अक्षयतृतीयेपासून काहीजण आंबे खायला सुरवात करतात. त्यावेळी आंब्याची मागणी देखील वाढत असते. बाजारात देखील आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. यावेळी खराडी, हडपसर, कोथरूड आणि मार्केटयार्ड या चार ठिकाणी आंबा महोत्सव भरविण्यात आला आहे. या ठिकाणी क्यूआर कोड असलेले आंबे विक्रीस आले आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील मार्केटमध्ये हे आंबे मिळतील का याची शक्यता कमी आहे.
.....
क्यूआर कोडमधून मिळणार माहिती :
परराज्यातून येणारा हापूस आंब्याच्या नावाने होणारी भेसळ थांबविण्यासाठी क्यूआर कोडचा पर्याय आणला गेला. त्यासाठी शेतकऱ्याला क्यूआर कोड स्टीकर दिले जाते. विक्रीसाठी पाठविलेल्या फळावर स्टीकर लावले जाते. ते स्कॅन केल्यावर हापूसची सविस्तर माहिती मिळते. यामध्ये बागायतदार कोण, बागेचे फोटो याची माहिती मिळते. फळावर लावलेल्या स्टीकरचा कालावधी १४ दिवसांचा असतो. त्यानंतर तो पुन्हा वापरता येणार नाही.
....
‘‘गेल्यावर्षीपेक्षा यंदा आंब्याचे उत्पादन कमी आहे. वातावरणातील बदलामुळे मोहोर गळाल्याने उत्पादन घटले आहे. मात्र उन्हाळा चांगला तापत असल्याने आता पुन्हा उत्पादनात वाढ होताना दिसून येत आहे. यंदा पिंपरी चिंचवडला आंबा महोत्सव घेण्याची शक्यता कमी असली तरी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे क्यूआर कोड असलेला हापूसच ग्राहकांनी घ्यावा.
- सुहास काळे, व्यवस्थापक, देशांतर्गत व्यापार विकास विभाग
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT