पिंपरी-चिंचवड

जादा परताव्याच्या आमिषाने सव्वा दोन कोटींची फसवणूक

CD

पिंपरी, ता. १३ : गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची दोन कोटी २२ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना वाकडमधील अथर्व अव्हेन्यू सोसायटीतील अर्थप्लस इनव्हेस्टमेंट या कंपनीच्या कार्यालयात घडली.
नवनीत हिरालाल पाटील (वय ३०), विनोद उत्तमराव पाटील (वय ३५) आणि सुनील गंगाधर पाटील (वय ३६, सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही कंपनीचे संचालक आहेत. नायगाव (ता. पालघर) येथील ४२ वर्षीय नागरिकाने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या मित्रांना व इतर गुंतवणूकदारांना अर्थप्लस इनव्हेसमेंट या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरवातीला काही दिवस परतावा दिला. त्यानंतर काहीच परतावा न देता गुंतवणुकीची रक्कमही स्वतःकडे ठेवत एकूण दोन कोटी २२ लाख ३७ हजार ११५ रुपयांची फसवणूक केली.
-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: भावी अधिकाऱ्यांचे भवितव्य टांगणीला! ‘एमपीएससी’ला अंतिम निकालाचा मुहूर्त मिळेना, जाहिरात निघून दोन वर्षे उलटली..

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, सरकारने जारी केली ही महत्त्वाची नोटीस

Solapur News: २० टक्के प्रमाणपत्रे खोटी! साेलापूरात कामगारांना अनुभव प्रमाणपत्र देणारे ठेकेदारही बोगस;'कामगार मंडळा’कडून तपास सुरू..

Ajay Devgn: ‘शैतान २’चा इशारा? दोन वर्षांनंतर अजय देवगच्या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली!

Latest Marathi News Live Update : वाळुज एमआयडीसीतील उद्योगांवर गॅस टंचाईचा परिणाम

SCROLL FOR NEXT