पिंपरी-चिंचवड

हप्ता वसुली करून टोळक्याची दहशत रावेत येथील घटना, चौघांना अटक

CD

पिंपरी, ता. १३ : टपरीचालकाला शिवीगाळ, मारहाण करून हप्ता वसुली केली. त्यानंतर टोळक्याने परिसरात दहशत माजवल्याची घटना रावेतमधील म्हस्केवस्ती येथे घडली.
याप्रकरणी प्रमोद ऊर्फ डिंपल इंद्रजित सिंह (वय २९, रा. म्हस्के वस्ती, रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोनेश देवेंद्र नाटेकर (वय ३५), गंगाधर देवेंद्र नाटेकर (वय २८, दोघेही रा. रमाबाईनगर झोपडपट्टी, रावेत), आकाश सुभाष आल्हाट (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि प्रकाश कुपेंन्द्र शिंदे (वय ३८, रा. म्हस्के वस्ती, रावेत) या आरोपींना अटक केली आहे. फिर्यादी यांची म्हस्के वस्ती येथे पानाची टपरी असून, आरोपी फिर्यादी यांच्याकडे आले. पान टपरीचा हप्ता दिला नाही म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. प्रमोद यांच्या रूममध्ये शिरून त्यांना बाहेर खेचले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आज हप्ता देतो की नाही, असे म्हणत पुन्हा बेदम मारहाण केली. दरम्यान, भीतीपोटी फिर्यादीने खिशातील एक हजार ३०० रुपये काढून आरोपी गंगाधर याला दिले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत तलवार भिरकावून परिसरात दहशत निर्माण केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले.
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: रस्त्याचे काम... तासभर जागेवरच थांब! पिंपरी ‘एमआयडीसी’ परिसरात वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या नियोजनावर संताप..

Solapur Sugarcane payment: साेलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली; शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले तीन हजार ४७६ कोटी, तीव्र संताप व्यक्त!

Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

Latest Marathi News Live Update : शेतकरी कुटुंबातील लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी सोनीपतमध्ये दाखल

Pune Health Crisis: पुण्यात तरुणाईवर अदृश्य संकट! ७५ हजारांना बीपी, ४४ हजारांना मधुमेह; जीवनशैलीचे आजार वेगाने पसरतायत

SCROLL FOR NEXT