पिंपरी, ता. १३ ः पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी (ता. १३) दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले. हिंजवडीसह काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. परंतु काही ठिकाणी झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे प्रकार घडले.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडमधील नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झाले होते. शहरातील तापमानाचा पारा ४० अंश सेल्सियस पार गेला होता. चालू उन्हाळ्यातील आतापर्यंत विक्रमी कमाल ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद यंदा बुधवारी (ता.९) झाली. त्यानंतर मात्र गेल्या तीन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली. रविवारी (ता.१३) किमान २२.८ आणि कमाल ३७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी दुपारी कडक ऊन पडले. सायंकाळी चारनंतर ढगाळ वातावरण झाले. शहरातील चिंचवडसह काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहत होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. सोसाट्याच्या वाऱ्याने काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. त्यामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. पिंपरीसह अनेक भागांत सायंकाळी वीजेचा लपंडाव सुरू होता. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.