पिंपरी-चिंचवड

शैक्षणिक गुणवत्तेसाठी मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण

CD

पिंपरी, ता. १५ ः शालेय नेतृत्व अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अकरा मास्टर ट्रेनर्स आणि तीन पर्यवेक्षकांनी क्रिएटनेट एज्युकेशन व आकांशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चार दिवसीय राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग घेतला. ही कार्यशाळा मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथे ‘एकलव्य’ स्वयंसेवी संस्थेत झाली. महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांसाठी कार्यशाळा होती. त्यामध्ये ‘टोटो-चान’ आणि ‘दिवसस्वप्न’ यांसारख्या प्रेरणादायी पुस्तकांवरील चर्चा, शालेय भेटींमधून आलेले अनुभव व उत्तम शैक्षणिक पद्धतीविषयी सविस्तर माहिती शहरातील प्रतिनिधींनी दिली. महापालिका शाळांमधील मास्टर ट्रेनर्स मुख्याध्यापकांना सहकार्य करत असताना स्वतःही सतत नवनवीन गोष्टी शिकत आहेत आणि विकसित होत आहेत. त्यांची शिकण्याची उत्सुकता, सहकार्याची वृत्ती आणि नावीन्यपूर्ण गोष्टी शिकण्याची तयारी नक्कीच शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणेल, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT