पिंपरी-चिंचवड

गतिरोधकांचे अपूर्ण काम चालकांसाठी ठरतेय जीवघेणे

CD

पिंपरी, ता. ४ ः निगडी-प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गतिरोधकावर पांढरे पट्टे टाकले नसल्याने गुरुवार (ता. ३) रात्री चार ते पाच अपघात घडल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. मोकाई चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, तळवडे, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून येणाऱ्या वाहनांची निगडी-प्राधिकरण येथील जलशुद्धीकरण केंद्रासमोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाहतूक सुरू आहे.

मात्र, या चौकात गतिरोधक नसल्याने अपघात घडत होते. त्यामुळे स्थानिकांनी महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महापालिकेने याची दखल घेत गतिरोधक बसविला. परंतु, यावर पांढरे पट्टे टाकण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहने सुसाट वेगाने येत आहेत. वाढले
बसविलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने गतीरोधकाचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्याने अनेकांचे अपघात होत आहेत.
त्यामुळे येथील गतिरोधकांवर पांढरे पट्टे बसविण्यात यावे. अशी मागणी स्थानिकांनी केली.

‘‘छत्रपती शिवाजी महाराज चौकात गतिरोधक नसल्याने अपघात होत होते. मात्र, गतिरोधक बसविल्यानंतर पांढरे पट्टे नसल्याने अपघात होत आहेत. महापालिकेने तत्काळ गतिरोधकावर पांढरे पट्टे टाकावे. त्यामुळे होणारे अपघात टळतील.
- राजरत्न सरवदे, नागरिक.

पिंपरी ः निगडी-प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसविलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने बनला धोकादायक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: यंदाही मुंबईची तुंबई! ८० ठिकाणी भरणा-या पाण्याचा उपसा करण्यासाठी ५४७ पंप बसविणार

Neeta Ambani: नीता अंबानींच्या घरात रोज बनतात तब्बल ४००० पोळ्या! कारण ऐकून तुम्हालाही बसणार नाही विश्वास; Viral

Latest Marathi News Live Update: बेंगळुरुमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Missing Link: खंडाळा घाटातील ट्रॅफिक, अपघात आणि विलंबाला ब्रेक... मेगा प्रोजेक्टला 'मिसिंग लिंक' हे नाव का? कोंडी पूर्णपणे संपेल का?

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत भव्य परेड! कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल आणि कडक निर्बंध लागू; कुठे अन् कधी?

SCROLL FOR NEXT