पिंपरी, ता. ४ : पिंपरी येथील गांधी नगर परिसरात मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन आणि स्नेह फाउंडेशनच्यावतीने मानसिक स्वास्थ्याविषयी प्रबोधन करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही व्यक्तीला मानसिक त्रास असल्यास त्याचा बाऊ न करता मदत मागणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती नैराश्यात गेली असेल, मनात आत्महत्येते विचार येत असतील तर कशा प्रकारे मदत मागता येऊ शकते, यावरही प्रबोधन करण्यात आले. संस्थेचे आरोग्य समुपदेशक मुकेश सावकारे व ऋषिकेश भंडारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कौटुबिंक कलह कशामुळे होतात. त्यातून बाहेर कसे पडावे, याबाबत पथनाट्य सादर केले. यामध्ये युक्ती माखिजा, अस्मि पटेल, नेहा फिलिप, परिक्रमा राजपाल, नंदेश हिरेमठ, हेमंत सागर यांनी सहभाग नोंदवला. हा उपक्रम पार पडण्यासाठी स्नेह फाउंडेशनच्या अर्चना जोगदंड, श्वेता कांबळे आदींनी मदत केली. अधिक माहितीसाठी मुक्ता मानसिक स्वास्थच्या हेल्पलाईनला ७८८७८८९८८२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
फोटो ः 03606
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.