पिंपरी-चिंचवड

कोरोनानंतर अनेक ‘पेट शॉप’ बंद मागणी कमी झाल्याने परदेशी पशू-पक्षांच्या दरात निम्म्याने घट

CD

राहुल हातोले ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ७ : कोरोना काळात वाढलेली परदेशी पशू व पक्ष्यांची मागणी आता घटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या दरात निम्म्याने घट झाली आहे. लॉकडाऊननंतर ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे घरात राहूनच काम करावे लागत होते. त्यामुळे अनेकांनी आपल्या एकटेपणावर मात करण्यासाठी पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची निवड केली. यामध्ये विशेषतः परदेशी प्रजातींच्या पक्ष्यांना आणि कुत्र्यांना प्रचंड मागणी होती. परिणामी त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या. मात्र, कोरोना संपल्यानंतर चार ते पाच वर्षांनी बहुतांश कंपन्यांनी कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरू केले. त्यामुळे नागरिक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडू लागले. परिणामी पाळीव प्राण्यांसाठी वेळ देणे त्यांना कठीण होऊ लागले आहे. यामुळे मागणी पूर्वीपेक्षा काही प्रमाणात घटली असून दर कमी झाले आहेत. तसेच त्यामुळे जागोजागी निर्माण झालेल्या ‘पेट शॉपी’ आता बंद झाल्या आहेत.
......
अशी घटली मागणी
कोरोनानंतर शहरातील जीवनमान पुन्हा पूर्वपदावर
‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढलेली मागणी आता कमी
दरात ५० टक्क्यांपर्यंत घट
लव्हबर्ड, कोकॅटो, मकाउ पक्ष्यांची मागणी कमी
परदेशी कुत्र्यांच्या प्रजातींची विक्री देखील घटली

कोरोना काळात दरवाढ
लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी पाळीव प्राणी आणि पक्ष्यांची निवड केली. यामध्ये विशेषतः परदेशी प्रजातींच्या पक्ष्यांना आणि कुत्र्यांना प्रचंड मागणी होती. परिणामी त्यांच्या किमती दुपटीने वाढल्या.
त्यावेळी पिंपरी-चिंचवड परिसरात विशेषतः लव्हबर्ड, कोकॅटो, मकाउ यांसारख्या आकर्षक रंगसंगती असलेल्या पक्ष्यांना मोठी मागणी होती. त्याचप्रमाणे कुत्र्यांच्या पामोलियन, लेब्रॉडोर, गोल्डन रिट्रीव्हर, जर्मन शेफर्ड, सित्झु, बीगल या प्रजातीही लोकप्रिय झाल्या होत्या. पूर्वी एका कोकॅटो पक्ष्याची किंमत एक ते दीड लाख रुपयांपर्यंत होती. ती आता ७०-८० हजारांवर आली आहे. मकाउसारख्या पक्ष्यांचे दरही आता स्थिरावले आहेत.

भारतीय पक्ष्यांवर बंदी
भारतातील पोपटासारख्या स्थानिक पक्ष्यांवर पाळण्यास बंदी असल्याने नागरिक परदेशी पक्ष्यांची निवड करतात. विशेषतः ऑस्ट्रेलियातील कोकॅटो पक्षी यामध्ये लोकप्रिय आहे. त्याचे पांढरे शरीर, काळी चोच आणि डोक्यावरील उठावदार तुरा यामुळे तो लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
दक्षिण अमेरिकेतील मकाउ पक्षी, ऑस्ट्रेलियातील कोकॅटो पक्षी हा लाखोंच्या घरात विकला जातो आणि अनेक घरांमध्ये तो आता शोभेचा भाग बनला आहे.

‘‘शहरात कोरोना काळात मोठ्या प्रमाणात परदेशी पशुपक्ष्यांना मागणी होती. परंतु आता मागणी असली तरी दरात मोठी घट झाली आहे. निम्म्याहून अधिक दर कमी झाल्याने अनेक पेट शॉपी बंद झाल्या आहेत.
- संजीव मुत्तुर, पेट शॉपी, पिंपरी.

‘‘कोरोना काळात मुलांना खेळण्यासाठी त्यांचा एकटेपणा घालविण्यासाठी अनेकांनी श्र्वानांची खरेदी केली. मात्र आता श्र्वानांचा खर्च, लहान असलेली पिल्ले आता मोठा झाल्याने त्यांना लागणारी जागा या अडचणी समोर आल्याने अनेकजण आपले श्र्वान विकत आहेत किंवा रस्त्यावर सोडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा किंवा परिसरातील शेल्टरहोमला भेट द्यावी. त्यामुळे या श्र्वानांना निवारा मिळेल.
-नियती रॉय सिन्हा, श्र्वानप्रेमी, हिंजवडी.
---------------------

२०१९ या वर्षीचे श्र्वानांचे दर :
पामोलियन - १२ ते १६ हजार रुपये
लेब्रॉडोर - २४ ते ३० हजार रुपये
गोल्डन रिट्रीव्हर - ३० ते ४० हजार रुपये
जर्मन शेफर्ड - ३० ते ४० हजार रुपये
सित्झु, बीगल - ३० ते ४५ हजार रुपये
.......
२०२५ या वर्षीचे दर :
पामोलियन - ६ ते ८ हजार रुपये
लेब्रॉडोर - १२ ते १५ हजार रुपये
गोल्डन रिट्रीव्हर - १८ ते २५ हजार रुपये
जर्मन शेफर्ड - १८ ते २५ हजार रुपये
सित्झु, बीगल - १८ ते २२ हजार रुपये
....

श्‍वानांची परवड
लहान पिलांना नागरिकांची मागणी आहे. मात्र, मोठी झाल्यावर या श्र्वानांना अधिक जागेची गरज भासते. त्यांना खाण्या-पिण्यासाठी लागणारा खर्च परवडत नसल्याने अनेकजण आपल्या घरातील श्वान घराबाहेर सोडून देत असल्याचे आढळून येत आहे. अशी तक्रार शहरातील अनेक श्र्वान प्रेमींनी केली आहे.
..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राम मंदिर देणगी वाद! ३५०० कोटी रोकड, सोन्या-चांदीचे रेकॉर्ड गायब; ६ वर्षांपूर्वी व्यवस्थापनाबाबत व्यक्त केलेली चिंता, ४ गंभीर त्रुटी

Ahilyanagar Crime: मतिमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला ‘नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप’; अहिल्यानगर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Nilesh Lanke: सात-बारा कोरा करा; अन्यथा मंत्रालयावर मोर्चा, नीलेश लंके यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयावर एल्गार

Koyna Dam History : कोयना धरणाचे पाणी ओसरले अन् उघड झाला पाण्याखाली लपलेला इतिहास; भग्न अवशेषांमधून समोर आलं जुनं वैभव, 74 वर्षांनंतर काय पाहायला मिळालं?

Mumbai Local: ए... दरवाजा बंद कर! लोकलमध्ये वादानंतर चाकूने भोसकलं, २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; डब्यात रक्ताचा सडा

SCROLL FOR NEXT