पिंपरी-चिंचवड

शहराला मिळाला २८,८९६ वाढीव इष्टांक

CD

नवीन शिधापत्रिका, सदस्य नोंदणीचा मार्ग मोकळा
शहराला २८,८९६ वाढीव इष्टांक मिळाल्याने अन्नसुरक्षेचे लाभार्थी वाढणार

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून नुकतेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांकाचे वाटप करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ११ विभागांना प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येत २८,८९६ आणि अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका संख्येत ४५ वाढीव इष्टांक मिळाला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील अल्प उत्पन्नधारक, विधवा, दिव्यांग आणि मजूर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच शिधापत्रिकेवर नवीन सदस्यांची नोंदणी आणि नवीन शिधापत्रिका काढता येणार आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत अन्नसुरक्षा योजनेतील (प्राधान्य कुटुंब लाभार्थी) लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती प्रतिमहिना ५ किलो अन्नधान्य अल्पदरात (तांदूळ ३, गहू २, भरड धान्य १ रुपये प्रति किलो) आणि अंत्योदय योजनेत प्रतिकुटुंब ३५ किलो अन्नधान्य दिले जाते. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत लोकसंख्येच्या तुलनेत परिमंडळ कार्यालयातील इष्टांक वाढलेला नाही. त्यामुळे गरजू व्यक्ती अन्नसुरक्षा आणि अंत्योदय योजनेसाठी पात्र असूनही लाभ घेता येत नव्हता. गेल्या दीड वर्षांपासून इष्टांक वाढवून देण्याची मागणी सुरू होती. अखेर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने १ एप्रिल २०२५ रोजी जिल्हानिहाय नवीन इष्टांक वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहर कार्यालयाअंतर्गत पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील ११ विभागाचा समावेश होतो. पूर्वी पुणे शहरासाठी अंत्योदय योजनेचा ७,४५९ इष्टांक होता. यात आता वाढ होऊन ७,५०४ इतका झाला आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचा १३,३६,९४१ इष्टांक होता. यात आता वाढ होऊन १३,६५,८३७ इतका इष्टांक झाला आहे.
----------
वितरण अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष
पिंपरी-चिंचवड शहरात शहरात अ (पिंपरी), ज (चिंचवड) आणि फ (भोसरी) हे तीन परिमंडळ कार्यालयाअंतर्गत २४८ स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत धान्याचे वाटप केले जाते. शहरातील एकूण दीड लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये अंत्योदय योजनेचे ३ हजार ७३० पेक्षा अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. तर, अन्नसुरक्षा योजनेचे (प्राधान्य कुटुंब लाभार्थी) १ लाख २४ हजार ५८६ शिधापत्रिकाधारक आहेत. सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ११ विभागांत २८,८९६ वाढीव इष्टांकाचे वाटप करणार आहे. यातील पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी परिमंडळ कार्यालयांना किती वाढीव इष्टांक मिळणार, याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहेत.
-------------
शिधापत्रिकाधारक
परिमंडळ कार्यालय - राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक (लाभार्थी) - अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारक (लाभार्थी)
पिंपरी - ३४,१४९ (१,४३,६२३) - १,५९७ (५,७४१)
चिंचवड - ४५,२५१ (१,६५,२७७) - २०२ (८२५)
भोसरी - ४५,१८६ (१,६९,९८९) - १९३१ (७,६१७)
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT