पिंपरी-चिंचवड

खाणीतील कचऱ्याने धोका, दूषित पाणी जमिनीत

CD

राहुल हातोले : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ९ : पिंपरी-चिंचवड शहरातील खाण आणि पाणथळ जमिनींचा वापर अयोग्य पद्धतीने होत आहे. येथील दुर्मीळ वनस्पती आणि पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मोशी वडमुखवाडी भागातील खाणीत कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ही खाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्याऐवजी तो जमिनीत गाडल्याने रसायनयुक्त पाणी जमिनीमध्ये मुरत आहे. ते परिसरातील बोअरवेल, विहिरीमध्ये मिसळून विषारी होत आहे. त्यामुळे जलचरांवरही परिणाम होत आहे.
मोशीतील वडमुखवाडी परिसरातील खाणीत सध्या शहराचा कचरा मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येत आहे. तसेच चिखली परिसरातील संभाजीनगर, टाटा कंपनीमधील तळी, भोसरी गार्डन, दुर्गादेवी टेकडी आणि आकुर्डी येथील गणेश तलाव हे सर्व भाग पाणथळ असून, ते जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलचर, देशी वनस्पती आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या ठिकाणी प्रदूषण, अतिक्रमण होऊ नये, यासाठी महापालिकेने खबरदारी घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

जैवविविधतेवर विपरित परिणाम :
काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध शहर होते. मात्र, अलीकडच्या काळात नद्या नाल्यांमध्ये रुपांतरित झाल्या, झरे व ओढे आटले, तळी व विहिरी बुजवण्यात आल्या. परिणामी, स्थानिक मासे व वनस्पतींच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. जलचरांचे प्रजनन थांबले असून, पाण्याच्या रासायनिक गुणधर्मातील बदलामुळे देशी वनस्पती रोडावल्या आहेत. या स्थितीचा थेट परिणाम पक्षी आणि जलचरांवर झाला आहे.

पर्यावरण रक्षणासाठी महापालिकेचे उत्तरदायित्व:
पर्यावरणप्रेमींनी महापालिकेला शहरातील खाणी व पाणथळ जागा संरक्षित करण्याची विनंती केली आहे. या भागांचे संवर्धन केल्यास ते नैसर्गिक पाण्याच्या शुद्धीकरणात, पूर नियंत्रणात व जैवविविधतेच्या संवर्धनात मोलाची भूमिका बजावू शकतात. तातडीने या भागांवर लक्ष देणे, कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट, स्वच्छता आणि अतिक्रमण रोखण्याचे उपाय महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शहरासाठी पुढील दिशा काय?
शहरातील पर्यावरणाच्या संतुलनासाठी व भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने वाचवणे अत्यावश्यक झाले आहे. खाणी, तळी, ओढे आणि पाणथळ भागांचे जतन हे फक्त पर्यावरणप्रेमींचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. महापालिकेने या ठिकाणी ‘इको-झोन’ घोषित करून संरक्षण करावे, अशी मागणीही पुढे आली आहे.

शहरातील पाणथळ भागांचे संरक्षण केले जात आहे. खाणींची ठिकाणे विकसित करण्यात आली आहेत. बर्ड व्हॅलीसारख्या परिसरात अनेक पक्षांचा अधिवास होत आहे. तसेच दुर्गाटेकडी आणि सीएमई परिसरात देखील पाणथळ परिसर सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता-१, पर्यावरण विभाग.

नदीमध्ये दोनशेपेक्षा जास्त जिवंत झरे आहेत. रसायनमिश्रित पाणी सोडल्याने नदी विषारी झाली असून भू-गर्भातील पाणी दूषित झाले आहे. नदीतील पाण्यामुळे काहींना दुर्धर आजार होत आहेत. तसेच नदीचे पाणी आपण फिल्टर करुन पितो, पण प्राणी दूषित पाणी पितात. त्यामुळे प्रसंगी त्यांना जीव गमवावा लागत आहे.
- शुभम पांडे, अध्यक्ष, वर्ल्ड फॉर नेचर.

NE25V04966

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT