पिंपरी-चिंचवड

ताण-तणाव विसरा, फक्त खळखळून हसा...

CD

पिंपरी, ता.९ ः दैनंदिन जीवनातील ताण-तणाव विसरायला लावणारे, निखळ मनोरंजन करुन खळखळून हसवणारे आणि त्यातूनच महत्वपूर्ण संदेश देणारे माध्यम म्हणजेच नाटक. ‘सकाळ’ नाट्य महोत्सवाच्या माध्यमातून अशीच उत्तमोत्तम व दर्जेदार नाटके पाहण्याची संधी नाट्य रसिकांना मिळणार आहे. १२ ते १४ एप्रिल या कालावधीत निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर हा नाट्यगृहात आयोजित केला आहे. महोत्सव कालावधीत दररोज रात्री नऊ वाजता नाट्य प्रयोगांना प्रारंभ होईल.
सकाळ माध्यम समूहाच्यावतीने आयोजित वरील नाट्य महोत्सव भरविण्यात येत आहे. बहुतांश शाळांमधील वार्षिक परीक्षा संपून उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. अनेकांच्या घरी उन्हाळ्यात सुटीसाठी नातलग व कुटुंबीय आले आहेत. अशावेळी संपूर्ण कुटुंबाला घेऊन सुटीचे नियोजन करत असाल; तर ‘सकाळ’ नाट्य महोत्सव एक उत्तम पर्याय असणार आहे. आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्यासाठी आणि निखळ विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी हा महोत्सव एक उत्तम पर्वणी आहे. याद्वारे प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख, संदीप पाठक, हृषिकेश शेलार, अनघा भगरे, सुशील इनामदार, चिन्मय माहूरकर, समृद्धी मोहरीर आदी लोकप्रिय कलाकार गाजवत असलेल्या नाटकांचा आस्वाद शहरातील रसिकांना घेता येणार आहे. या नाट्य महोत्सवाचे ‘मिरॅकल’ हे ग्रुप प्रायोजक आहेत.

सकाळ माध्यम समूहाचा सांस्कृतिक क्षेत्रातही फार मोठा वाटा आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे. विशेष म्हणजे हा नाट्य महोत्सव ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होत आहे. जिथे नाटकांचे प्रयोग अजूनही जास्त झालेले नाहीत. ‘सकाळ’ने मात्र सगळ्या तांत्रिक अडचणी बाजूला सारून हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे या भागातील रसिकांना उत्तम नाटके पाहण्याची पर्वणी मिळाली आहे. या नाट्य महोत्सवामुळे इतर निर्मात्यांनाही इथे प्रयोग घेण्यास प्रोत्साहन मिळेल. नाट्य रसिकांच्या आशा पल्लवीत होतील. कदाचित ही नव्या बदलाची नांदी असेल.
- ज्योती कानिटकर, नाट्यप्रेमी

सकाळ नाट्य महोत्सव हा अतिशय सुंदर उपक्रम आहे. या महोत्सवाद्वरे उत्तमोत्तम नाटके रसिकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यासाठी ‘सकाळ’चे अभिनंदन. ‘सकाळ’ने हाती घेतलेले कार्य हे नेहमीच सिद्धीस जाते. त्यामुळे नाट्य महोत्सवाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमही ‘सकाळ’ने सुरू करावेत. त्यासाठी आम्ही साहित्यिक मंडळी नेहमीच ‘सकाळ’च्या पाठीशी उभे आहोत.
- राज आहेरराव, ज्येष्ठ साहित्यिक

असे आहे नियोजन
काय : ‘सकाळ’ नाट्य महोत्सव
कुठे : ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी प्राधिकरण
कधी : १२ ते १४ एप्रिल
किती वाजता : रात्री ९ वाजता

महोत्सवातील नाटके
तारीख व वार / नाटक / कलाकार
१२ एप्रिल, शनिवार / नियम व अटी लागू / संकर्षण कऱ्हाडे व अमृता देशमुख
१३ एप्रिल, रविवार / वऱ्हाड निघालंय लंडनला / संदीप पाठक
१४ एप्रिल, सोमवार / शिकायला गेलो एक / प्रशांत दामले, समृद्धी मोहरीर, चिन्मय माहूरकर, सुशील इनामदार, अनघा भगरे, हृषिकेश शेलार

सवलतीच्या दरात तिकिटे (प्रतिव्यक्ती रुपयांत)
- सीझन तिकीट (तळमजला) : १२००
- प्रतिनाटक तिकीट (तळमजला) : ५००
- प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) : ४००

तिकीट बुकिंग सुविधा
ऑनलाइन : book my show
मोबाईल : ८९७५२३७०४१

महोत्सवाबाबत अधिक माहितीसाठी संपर्क : अक्षय - ९५६१३१४६७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaccine QR Code: मोठा निर्णय! आता स्कॅन करा आणि औषधाची माहिती मिळवा; सरकारने औषध पॅकेजिंगचे नियम बदलले

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे दोषी; मृत्युदंड की जन्मठेपेची शिक्षा यावर सोमवारी निकाल

Traffic Challan Rules: वाहनचालकांसाठी मोठा झटका! लोकअदालतीत जाण्यापूर्वी 50% दंड भरणे अनिवार्य; जाणून घ्या नवे नियम

Innovation Mahakumbh 2.0 : पुण्यात होणार इनोव्हेशन महाकुंभ २.०! एसएनडीटीतील १११ विद्यार्थ‍िंनी मांडणार स्टार्टपच्या नवसंकल्पना

Mangalwedha Sowing Delayed : मंगळवेढ्यात 35 हजार हेक्टरवर पेरणी रखडली दुष्काळाची गडद छाया

SCROLL FOR NEXT